Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मुंबई पावसात तुंबली: स्मार्ट महाराष्ट्र अपडेटस…

Author: Share:
मुंबईत पावसाचा जोर सकाळपासून कायम आहे. दुपारी पशु विसावतोय असे वाटत असतानाच पुन्हा पावसाने जोर धरला आहे. अत्तापर्यंत सरासरी १५२ सेमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासात कुर्ला येथे  ३०० मिमी, परळमध्ये २८५ मिमी, अंधेरीमध्ये २७० मिमी पाऊस पडला आहे. भांडुप मध्ये २५१, वांद्रे पश्चिम येथे २४७, आणि बीकेसी मध्ये २०४ मिमी पाऊस पडला आहे.  पाऊस पडला आहे.  वेधशाळेने, पुढील २४-४८ तासात जोरदार पावसाचा इशारा दिल्याने, समस्यांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.
  • हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेवाहतूकीवर प्रचंड परिणाम पडला आहे. सायन, एल्फिस्टन दादर या स्टेशनमध्ये रुळांवर पाणी आल्याची चित्रे पाहायला मिळाली.
  • घाटकोपर, दादर-हिंदमाता, माटुंगा , माहीम परळ या भागांमध्ये विशेषतः आणि इतरही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी तर कमरेएवढे पाणी साचले आहे. गाड्यासुद्धा यामध्ये अर्ध्यापर्यंत बुडाल्याची दृश्ये पाहायला मिळत आहेत.
  • समुद्र खवळल्यामुळे आणि धुक्यामुळे वांद्रे वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद केला गेला आहे.
  • लालबागच्या राजाचे दर्शनही बंद करण्यात आले आहे.
  • केईएम इस्पितळात तळमजल्यावर पाणी शिरल्याने रुग्णांना पहिल्या मजल्यावर शिफ्ट केले आहे.
  • आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका! असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

आपत्कालीन क्रमांक:

  • मुंबई महापालिका: १९१६
  • मुंबई पोलीस : १००
  • सेंट्रल रेल्वे कंट्रोल रुम: ०२२-२२६२०१७३
  • वेस्टर्न रेल्वे कंट्रोल रूम: ०२२-२३०९४०६४, ०२२-२०३७०५६४
Previous Article

बेस्ट ने सोडल्या आहेत जादा बसेस

Next Article

नांदगाव येथे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित करिअर फेअर उत्सहात संपन्न

You may also like