हायकू स्पर्धा २०१७; स्वलिखित हायकू आम्हाला पाठवा

Author: Share:

शिरीष पै ह्यांच्या स्मृतीस वंदन करुन स्मार्ट महाराष्ट्र आयोजित करीत आहे हायकू स्पर्धा!! कवींनी आपले चार हायकू आम्हाला पाठवायचे आहेत आणि या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत मायबाप रसिक…

१ आपले चार हायकू आम्हाला दिनांक २४ सप्टेंबर २०१७ पर्यंत smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवा.

२ सबजेक्टमध्ये “हायकू स्पर्धा २०१७” असे लिहा. आम्ही आपले हायकू smartmaharashtra.online वेबपोर्टलवरवर अपलोड करु.

परीक्षण: ज्या हायकूस अधिक views मिळतील ते विजेता ठरतील. दिनांक २६ सप्टेंबर २०१७ पासून हायकू स्मार्ट महाराष्ट्रवर उपलब्ध होतील व दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ पर्यंत मिळालेले views ग्राह्य धरले जातील.

आपले हायकू असलेली लिंक तुम्हाला अधिकाधिक शेअर करुन लोकांपर्यंत पोहोचवायची आहे.

तर मग वेळ कशाला दडवता? आताच लिहायला सुरुवात करा.

अट अशी की हायकू नवीन असावे आधी कुठेही प्रकाशित झालेले नसावे.

पहिल्या क्रमांकास रु. ३००/- व ऑनलाईन प्रशस्तीपत्रक मिळेल.

दुसर्या व तिसर्या क्रमांकास ऑनलाईन प्रशस्तीपत्रक मिळेल.

तसेच इतरांना ऑनलाईन सहभाग प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.

 हायकू म्हणजे काय?

हायकू हा एक जपानी भाषेतील काव्यप्रकार आहे.

कविता तीन ओळींचीच असते.

प्रत्येक ओळीत खूप जास्त अक्षरे नसावीत (५-८). कोणत्याही दोन ओळीत यमक असावे. निसर्ग, धर्म, मानवी मनाची सांगड, निसर्गातील एखादा क्षण हे साधारण विषय हायकूमध्ये हाताळले जातात. पण या स्पर्धेत विषयाला बंधन नाही.

हायकू काव्यप्रकार छोटा, दिसायला सोपा असला तरी करायला अवघड आहे.

उदा.

नाही जमत सन्यास

तर संसार नीट करा

खा, प्या मजा करा…

शिरीष पै

बदलतं जग…

माणूसही बदलतो

जगण्याला नियम नसतो..

शिरीष पै

Previous Article

भंपक लोकांपासून सावध रहा – वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य

Next Article

गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुंबई मराठी पत्रकार संघाकडून निषेध

You may also like