Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

शतक झळकावताना हार्दिक पांड्याचे नवे विक्रम

Author: Share:

भारताच्या कसोटी संघात नव्याने वर्णी लागलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आज तडाखेबंद शतक झळकावून भारताला ४८७ धावांची मजल गाठून दिली असताना काही विक्रमही मोडीत काढले.

११६ व्या शतकात २ चौकार आणि ३ षटकारांसहित २६ धावा कुटत, हार्दिक पंड्याने कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावे असलेला प्रत्येकी २४ धावांचा विक्रम मोडीत काढला. एकाच शतकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा लिजंडरी फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे.

या व्यतिरिक्त वीरेंद्र सेहवागच्या श्रीलंकेविरुद्धच ब्रेबॉर्न स्टेडियम वर मांडलेल्या सात षटकारांच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम श्रीलंकेविरुद्धच १९९४ मध्ये नवज्योतसिंग सिद्धूच्या नावावर आहे.

लंच अगोदर सर्वाधिक धावा काढण्याचा वीरेंद्र सेहवागचा ९९ धावांचा विक्रमही १०७ धावा काढून पंड्याने मोडला.

८६ धावांमध्ये शतक झळकावून पंड्या सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम ७८ चेंडूत वेस्ट इंडिज विरुद्ध २००६ मध्ये वीरेंद्र सेहवागच्या नावाने आहे.

आठव्या क्रमांकावर येऊन श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावणारा हार्दिक पंड्या तिसरा फलंदाज आहे आणि  श्रीलंकेत असे करणारा दुसरा फलंदाज आहे.

श्रीलंके विरूद्ध वेगवान शतक झळकावणाऱ्या परदेशी फलंदाजाच्या ८६ चेंडूच्या वसीम अक्रमच्या विक्रमाशीही पंड्याने बरोबरी केली.

 

 

 

 

Previous Article

इकॉनॉमिक सर्व्हे २०१७: समजून घ्या

Next Article

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मुंबईच्या शार्दूल ठाकूरची निवड

You may also like