हिंदु धर्मात विविध देवतांची उपासना केली जाते. ज्या देवाची उपासना केली जाते त्या देवावर भाविकांची नितांत श्रद्धा असते. उदाहरणार्थ, श्री समर्थ रामदास श्रीरामाचे भक्त होते. त्यांनी जीवनाचे कर्तव्य म्हनून श्रीरामाची उपासना केली. संत एकनाथ हे श्री दत्तत्रयांची तल्लीनतेने भक्ती करायचे.
गणेश आद्य देव मानले जातात, म्हणून सर्व देवांच्या आधी त्यांची पूजा केली जाते.
मुंबईमधील एल्फिस्टन रोड येथील सयानी मार्गाच्या रस्ता विस्तार प्रकल्पाच्या वेळी महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी श्री हनुमानाची मूर्ती उकरुन काढली.
त्यांनी मूर्तीला रस्त्याच्या कडेला ठेवले व आपले काम करु लागले.
श्री सिद्धिविनायक मंदिरात येणार्या भाविकांनी ही गोष्ट प्रमुख पुरोहित श्री गोविंद पाठक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ताबडतोब ती हनुमानाची मूर्ती आणली व त्यासाठी एक छोटे मंदिर बांधले. ही सुमारे १९५२ ची घटना आहे.
पुनर्बांधणीमुळे हनुमान मंदिराला नवीन रुप प्राप्त झाले आणि अशा पद्धतीने आजचे हे मंदिर उभे आहे.
मंदिर उघडल्यापासून बंद होईपर्यंत, हनुमान मंदिराचे पूजा, नैवेद्द आणि आरतीचे स्वतःचे वेगळे वेळापत्रक आहे. दर शनीवारी भक्तगण तेल आणि रुईचा हार अर्पण करतात, ज्या दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी असते तेव्हा कुपन पद्धतीने किमान किंमतीत हे उपलब्ध असते.
@टीम स्मार्ट महाराष्ट्र