७५ वर्षांच्या आजी करतात फायटींग

Author: Share:

तुम्ही तुमच्या आजीला गोष्ट सांगताना पाहिलं असेल. कविता म्हणतात पाहिलं असेल. फार फार तर तुमची आजी तुमच्यासोबत खेळत असेल. पण केरळमधील या आजी मात्र फायटिंग करतात आणि फायटींग शिकवतात. विश्वास बसत नाही ना? पण हे सत्य आहे. केरळमध्ये राहणार्‍या ७५ वर्षांच्या आजीबाई मार्शल आर्ट्स शिकवतात. कलरीपायट्टु हे एक प्राचीन मार्शल आर्ट्स आहे.

 

पाहा मिनाक्षी यांचा हा चित्तवेधक व्हिडिओ:

https://www.facebook.com/100003524288333/videos/1317442098383254/

 

मिनाक्षी या जगातील सर्वात वृद्ध मार्शन आर्ट्स प्रशिक्षक आहेत. त्याचं म्हणणं आहे की महिलांनी ही विद्या शिकली पाहिजे. पुरुष ही विद्या शिकतात. पण आता महिलांचा सहभागही वाढू लागला आहे. त्या जवळ जवळ ६७ वर्षाम्पासून कलरी शिकवत आहेत. त्या म्हणतात, ही विद्या कुणीही पूर्णपणे शिकू शकत नाही. कारण यात शिक्यासारखं पुष्कळ आहे. तुम्ही कितीही शिकलात तरी काही ना काही राहून जातं.

कलरी प्राचीन विद्या आहे. इंग्रजांनी मात्र यावर बंदी आणली होती. कारण त्यांना या योद्ध्यांची भिती वाटत असावी. मिनाक्षी यांच्या कडथनदन कलारी संगम या शाळेत जवळ जवळ १५० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचा ओढा मुलींना शिकवण्यात अधिक आहे. त्याच प्रमाणे त्या मुलींच्या मातांनाही शिकवतात. स्त्रीयांनी स्वसंरक्षण करावे, यासाठी कलरी हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वात महत्वाची बाब त्या प्रशिक्षणासाठी पैसे घेत नाहीत. पूर्वी जसे गुरुकूलमध्ये गुरु दक्षीणा देण्याची पद्धत होती. तसे विद्यार्थी वर्ष अखेरीस त्यांच्या स्वेच्छेने मिनाक्षी  यांना गुरु दक्षीणा देतात.

 

या लिंकवर तुम्ही मिनाक्षी यांच्या लढवय्यापणाची एक झलक पाहू शकता

https://www.facebook.com/IndiaRisingNews/videos/1640850549490139/

 

त्या म्हणतात की कलारी शिकण्याचे असे विशिष्ट वय नाही. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात करु शकता तितक्या लवकर करावे. ही प्राचीन विद्या त्यांनी पुनरुज्जीवीत केली आहे. अशा कितीतरी प्राचीन विद्या आज काळात ओघात नाहीसा झाल्या आहेत. म्हणून या आजीबाईंचे करावे तितके कौतुक कमीच आहे. त्या या वयातही एका नवतरुणीला लाजवतील अशा प्रकारे कलारी सादर करतात. साडी नेसून ज्या वेळी या आजी पुरुषांशी दोन हात करतात, तेव्हा आपल्याला मां कालीचे दर्शन झाले आहे, असे वाटते. ही विद्य आता देशभरात पसरावी जेणेकरुन आपले देशवासी, विशेषतः स्त्री सुरक्षित होतील.

 

स्मार्ट महाराष्ट्रतर्फे या आजीबाईंना मानाचा मुजरा…

Previous Article

भाषेचे महत्व

Next Article

सांगली कारागृहात संवाद बंदीजनांशी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन

You may also like