डाऊनलोड न करताही , आता गेम्स खेळायला मिळणार

Author: Share:

गुगलमुळे आपले जीवन सहज सोपे झाले आहे. आपल्याला कशाचीही माहिती हवी असल्यास आपण गुगलची मदत घेतो. गेम खेळून मनोरंजन करणारे खूप आहेत. खासकरुन लहान मुलं ही मोठ्या प्रमाणावर गेम खेळतात. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे अनेक गेम्स असतात. याचं संदर्भातील एक नवकोरं अॅप्लिकेशन लॉंच केलं आहे.

गेम खेळण्यासाठी ते आधी डाऊनलोड करावे लागते. मात्र आता डाऊनलोड न करताही गेम खेळता येणार आहे. यासाठी गुगलने एक अॅप्लिकेशन लॉंच केलं आहे. या अॅपच्या मदतीने प्ले स्टोर अॅप डाऊनलोड व इनस्टॉल न करतासुद्धा गेमचे प्रीव्हू पाहता येतील. गुगल प्ले इंस्टेट, गुगल प्ले स्टोअर, गुगल प्ले गेम्स व इतर ठिकाणी गेम्स उपलब्ध आहेत.

गुगल नेहमीच वापरकर्त्यांना नवनवीन फिचर्स देउन खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. याचाच भाग म्हणजे गुगलने प्ले गेमच्या अॅपच्या रिडीझाईन्सची घोषणा केली आहे. यात अनेक नवे फिचर्स आहेत. गुगलने प्ले गेम्स अॅपमध्ये नवे UI अपग्रेडस करण्यासोबतच नवीन इंस्टेट कॅटेगरी सादर केल्या आहेत. या अपडेटमध्ये वापरकर्ते व्हिडीओचे ट्रेलर्स पाहू शकतात. यासोबतच सर्चच्या बटना व्यतिरिक्त अनेक फिल्टर्सही देण्यात आले आहे.

Previous Article

आज सेंसेक्स १२९ अंक घसरुन, ३३००६.२७ वर बंद झाला.

Next Article

” इवल्या इवल्या गोष्टी ” स्तंभलेखनसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

You may also like