Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

गोंधळशाही

Author: Share:
देशाच्या राज्यव्यवस्थेच्या मंदिरांमध्ये होणारे गोंधळ आपल्याला नवीन नाहीत. आज पालिकेतील गोंधळाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सभागृहे तहकूब होतात, दुसऱ्या दिवसावर ढकलली जातात. सदस्य निलंबित होतात.  हे सर्व लोकशाहीस आदर्शवत आहे काय? सदस्य एकमेकांवर आणि सभापतींवर चालून जातात, कचाकचा भांडतात, धक्काबुक्की करतात हे शोभून दिसते काय? राजदंडासारखे लोकशाहीचे प्रतीक पळवण्याइतकी, कागदपत्रे फाडून सभापतींवर फेकण्याइतकी मजल जाते हे कुठे शोभून दिसते? लोकशाहीत विरोध नसेल तर सत्ताधारी हुकूमशहा होण्याची भींती असते. पण विरोध ठोकशाही पद्धतीने करता येत नाही. मात्र तोच मूळ स्वभाव असेल तर लोकशाहीच्या मंदिरातही त्याचा नंगानाच दिसणारच! माणूस जसा येतो तसाच तो वागतो. चूक आपली आहे… कारण प्रतिनिधी निवडताना तो कुठच्या स्वभावधर्माचा आहे, पार्श्वभूमीचा आहे, यावरूनच तो पुढे कसा वागेल हे अवलंबून असते! 
 
सकाळी औरंगाबादेत वंदे मातरम वरून गोंधळ माजला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात वंदे मातरम ने होते तशी आजही झाली. मात्र एमआयएमच्या दोन सदस्यांनी उभे राहण्यास नकार दिल्यामुळे सेना भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्या दोन सदस्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.  सभागृहात माईकची तोडफोड आणि नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की झाली. एमआयएमचे नगरसेवक अब्दुल मतीन आणि काँग्रेसचे नगरसेवक सोहेल शेख यांना निलंबित केले गेले. दुसऱ्या घटनेत, नाशिक पालिकेमध्ये झालेल्या गदारोळात चक्क राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. वाढलेल्या मालमत्ता करावरून शिवसेनेने भाजपविरोधात हा गदारोळ माजवल्याचे समजते. 
 
आमच्या लोकशाहीला लागलेले एक ग्रहण म्हणजे लोकशाहीच्या मंदिरातील दंडेलशाही. वरच्या सभागृहांमध्ये, हि दंडेली बऱ्याचदा सभागृहाच्या सेशन वर बंदी घालणे, सभागृहातून निघून जाणे अशा स्वरूपात असते. जसे जसे स्थानिक पातळीवर यावे तशी ही दंडेली अधिक आक्रमक होते. मग कधी सभापतींच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडतात, कधी कागदपत्रे फाडून भिरकावण्याचे, गडबड गोंधळ आणि घोषणाबाजी करण्याचे आणि कधी अशा स्वरूपात राजदंड हिसकावण्याचे. राजदंड म्हणजे म्हणजे सार्वभौमत्वाचे प्रतीक! तो  करणाऱ्यांना काय म्हणावे?
 
या सर्वातून, फक्त सभागृहाचा वेळ वाया जातो. सभागृहे तहकूब होतात, दुसऱ्या दिवसावर ढकलली जातात. सदस्य निलंबित होतात.  हे सर्व लोकशाहीस आदर्शवत आहे काय? प्रत्येक सभागृह ठराविक वेळेसाठी एकत्र येते.  अनेक मुद्दे यावेळेस समोर असतात. काही मुद्दे अचानक येतात. प्रश्न विचारले जातात. यातून उत्तम चर्चा घडणे आणि त्यातून जनहिताची कामे मार्गी लागणे एवढेच संविधानकर्त्यांना अपेक्षित नव्हते काय? 
 
वास्तवात घडते काय? जनहिताचे बुरखे घालून फक्त समोरच्या पक्षाला राजकीय कोंडीत पकडण्याचे मुद्दे, प्रश्न मांडले जातात. प्रश्न विचारण्यासाठीची जी तरतूद आहे, त्यात असे प्रश्न मांडले जावेत ज्यात शासनाकडून काही उत्तर मिळवता येईल. शासनाला चूक दाखवता येईल हि अपेक्षा असते. फक्त चुका दाखवणे, किंवा चुका निर्माण करणे हे अपेक्षित नसते. पण होते काय ? विरोधी पक्ष असे मुद्दे काढतो, ज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे इतर घोटाळे आणि अनियमितता समोर येईल. यातून फक्त वादावादी रंगते. वादावादी वाढते तेंव्हा ती गुंडशाहीचे स्वरूप धारण करते. 
 
याचाच परिणाम असा होतोत, कि सेशन्स संपण्याच्या आधी विधेयके आणि बिले मंजूर करण्याचा सपाटा लागतो. चर्चा न करता किंवा अर्धवट चर्चा करून बिले मंजूर होतात, ज्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना भरावा लागतो. म्हणजे सभागृहे चालतात त्यामध्ये गुणात्मक वेळ (गुणात्मक काम होण्याचा वेळ)  कमी असतो. हीच भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे. वास्तविक गुणात्मक काम म्हणजे काय हेच मुळात आमच्या प्रतिनिधींना माहित नसावे. 
 
यासाठी जबाबदार आहोत तुम्ही आम्ही. कारण आम्ही गदारोळ करणारे प्रतिनिधीच सभागृहात पाठवतो. विरोध करणे योग्य आहे आणि आवश्यक आहे. लोकशाहीत विरोध नसेल तर सत्ताधारी हुकूमशहा होण्याची भींती असते. पण विरोध ठोकशाही पद्धतीने करता येत नाही. मात्र तोच मूळ स्वभाव असेल तर लोकशाहीच्या मंदिरातही त्याचा नंगानाच दिसणारच! ज्यावेळी गोंधळामुळे सभागृहे तहकूब होतात, तेंव्हा हाच नंगानाच दिसतो. यातून किती वेळ वाया जातो आणि किती पैसा वाया जातो हे आपण पाहतो. पण हा वेळ वाया नसता गेला तर किती कामे झाली असती, किंवा हि ऊर्जा चांगल्या ठिकाणी वापरली असती तर किती उत्तम प्रश्नोत्तरे घडली असती, किंवा असा वेळ वाया घालवल्याने नंतर सेशन संपताना जी घिसाडघाई केली जाते, त्याने गुणवत्तेचे किती नुकसान होते याचा विचार आपण केंव्हा करणार आहोत? 
विचार केला गेला पाहिजे मुळात प्रतिनिधी निवडताना.. आपण कुठल्या स्वभावकुळाच्या आणि पार्श्वभूमीच्या प्रतिनिधीला निवडून देत आहोत, यावर पुढील पाच वर्षे तो आपली काय कामे करणार हे अवलंबून असते. सभागृहांना लोकशाहीची मंदिरे म्हणणारी, तिथे आपण निवडून जाणे हा लोकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आणि म्हणून आपण लोकांचे विश्वस्त आहोत अशी मनोवृत्ती असणारी आणि लोकांचा वेळ आणि पैसा आपण वाया घालवता कामा नये असे विचार करणारी वृत्ती प्रतिनिधी म्हणून निवडली गेली पाहिजे.
 
जेंव्हा सामान्य मतदार असा आग्रह धरेल तेंव्हा अशा मनोवृत्तीची माणसे प्रतिनिधी म्हणून जातील. अन्यथा आपण गोंधळीच पाठवणार असू, तर गोंधळाखेरीज कशाची अपेक्षा धरायची?  प्रश्न फक्त सभागृहाच्या वेळेचा नाही, जर मुळात मनोवृत्ती ‘विश्वस्ताची’ नसेल तर इतर वेळेसही तो काय दिवे लावत असेल हे समजायला वेळ लागणार नाही!
 
हा विचार ते कधीच करणार नाहीत. कारण त्यांचे  जात नाही! जातेय तुमचे आमचे.. विचार आपण करूया!.
Previous Article

जीएसटी रिटर्न्स भरण्याची तारीख पाच दिवसांनी वाढवली. 

Next Article

उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरले, २३ ठार ४० प्रवासी जखमी

You may also like