गोळाफेकचा थरार

Author: Share:

काही लोकांना नियम माहीत नसतात.कोणतेही कार्य करतांना ते नियमाला धरुन करीत नाही. मग फसगत होते. आणि मित्र मंडळी लोकं हसत असतात.अशावेळी कधी आपल्याला दुःख होते, वाईटही वाटते. कधी आपणच हसत असतो.

आमच्याही काँलेजात अशीच एक घटना घडली.तेही गोळाफेकमध्ये.गोळाफेक हा मुलांचाही होता. मुलींचाही. मुलांमध्ये कोणी तरलं नाही वा मुलींनीही कोणाला तारलं नाही.शेवटी अपयशच.
जया.पाहायला सुंदर होती. थोडी शरीरयष्टीची. पण नाजुक मैना. तिच्याकडे पाहिल्यावर ती गोळा फेकु शकेल असं कधीच वाटत नव्हतं.पण सोपस्कार म्हणुन हा गोळा फेकणे असल्याने आमच्या काँलेजनं जयाला मैदानात उतरविलं. पण निवड चुकीची होती.तिच्यापरस ताकतवार होती.योगी.म्हणजे आजची योगीता.
कधीही न खेळलेल्या जयाला जेव्हा मैदानात उतरविले. तेव्हा मात्र फजितीचा अनुभव आला.आम्ही जिंकणार नव्हतो हे माहित होते.तरीही आम्ही आमच्या पदरात निराशा पाडुन घेतली.

जयाला गोळाफेक जमत नव्हते असे नाही.तिला ताकद नव्हती असे नाही.तिला नियम माहित नव्हते असेही नाही. पण जेव्हा ती ट्रँकवर उतरली.तेव्हा गोळा फेकतांना तिचा तोल गेला आणि गोळा मागे फेकला गेला. बस आमच्या काँलेजचं वाईट झालं.पण ती हार माहित असल्याने याचं वाईट न वाटुन घेता जो खो खो निर्माण झाला.कोणी म्हणायला लागलं की जयाला नियम माहित नसेल.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


तर कोणी म्हणायला लागलं जयाने गोळा जाणुनबुजून मागे फेकला.तर कोणी म्हणायला लागलं तिचा तोल गेला.
जयाला हिरमुसलं वाटलं. तिच्या अंगाची लाही लाही झाली. पण ती निराश झाली नाही. उलट बळ एकवटुन तीही हसायला लागली.मात्र बाकीच्या काँलेजला संधी मिळाली.ते म्हणायला लांगले की या महाराष्ट्र काँलेजला नियम माहित नसावे.

आम्ही पहिल्याच प्रयत्नात जाणुनबुजून चुक करुन हारलो होतो.जयाने चुक केली होती.ती काँलेजला भोगावी लागली होती.मात्र जयाच्या मनात तसा गोळा फेकायचा विचार नव्हता.

आम्ही हारलो असलो तरी भरपुर या गोळाफेकनं आनंद मिळवुन दिला.या गोळाफेकच्या थराराने आम्ही हारलो असलो तरी दुःखावर आनंदाने बाजी मारली होती.
तो आठवणीचा काळ गेला पण आजही जया आठवली की तिने गोळाफेकमध्ये जो पराक्रम केला तो आठवला की आजही हसायला येतं.आजही तिथे उपस्थीत असलेल्या मैत्रीणींना फोन करुन हा पराक्रम विचारल्यास प्रत्येकजण आजही खो खो हसतो.

विचारताच सांगतो,”जयाला नियम माहित नव्हते.तिनं गोळा मागं फेकला.”
अलिकडे सातत्याने नियमांची पायमल्ली होतांना दिसते.नियमात कोणी चालत नाही.त्याची सुरुवात आमच्या जयाने केलेली आहे.आमची जया ही नियमातच चालणारी असुन तिचा तोल जर गेला नसता तर कदाचित आम्ही बाजीही मारली असती.

ते दिवसं गेले. पण आजच्या सार्वजनिक जीवनात आम्हाला पदोपदी असा गोळाफेक चा थरार अनुभवायला मिळतो.वेळोवेळी जया सारख्या मुली दिसतात.आपल्याच हाताने आपली बाजी समाप्त करणा-या.कदाचित जयाला दोन गुण का मिळाले नसतीलही.पण तिच्या त्या गोळाफेक च्या उपस्थितीने तिच्या मनात प्रचंड विश्वास निर्माण केला होता. जयाची कामगीरी जरी तोल गेल्याने सुमार राहिली असली तरी तिच्या त्या कामगीरीने आमच्या मनावरील ताण दूर केला होता.जयाच्या कामगीरीने तसेच इतर काँलेजच्या टोमणे मारण्याने उदास झालेले मन त्यातुन आमच्या काही भगिनी तर हसल्या एक विरंगुळा म्हणुन. तो आमचा अपमानच होता.होते कधी एखादी चुक.ती काही जयाने जाणुनबुजून केली नव्हती.पण त्यातुन वैषम्य झालेलं मन, त्या मनाला सावरायचे होते. झालेल्या चुकीची झीज भरुन काढायची होती.नव्हे तर अपमानाचा बदला घ्यायचा होता.

हीच गोळाफेकची हार लक्षात घेता आम्ही याचा बदला घेण्याचे ठरविले.हाच बदला घेण्यासाठी आम्ही पुढील खेळात असे लढलो की चँम्पीयन शिप आम्ही खेचुनच आणली.

जयाच्या फाऊल झाल्याने आम्ही हारलो असलो तरी जयाच्या रुपाने जे बाळकडु आम्हाला मिळाले, ते बाळकडु बळ आणणारे होते नव्हे तर त्याच बाळकडुच्या जोरावर आम्हाला पुढचा प्रवास करता आला.तसेच पुढची दिशा ठरवता आली.

आजही तिला त्या गोष्टी आठवत असतील. आपल्यावर हसणा-या मित्र मैत्रीणीचा राग येत असेल कदाचित……पण मी सांगतो की तिचा गोळाफेकचा थरार आमच्या विजयाची पायाभरणी होती.

लेखक: अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

येड्यांची जत्रा

Next Article

सोशल मीडियाचा वापर जरा जपूनच

You may also like