“इथे” लग्नात वधू-वराला दारु पाजली जाते!

Author: Share:

लग्न म्हणजे दोन परिवारांचा संगम. पारंपारिक पद्धत, वेगवेगळ्या प्रकाराच्या विधींनी दोन घरांना जोडणारा हा सोहळा. भारतासारख्या मोठ्या देशातील प्रत्येक भागात लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अशीच एक भन्नाट पद्धत छत्तीसगडमधील एका आदिवासी समाजात आहे. या समाजातील लग्नांमध्ये वधू-वराला दारु पाजण्याची पद्धच आहे.

छत्तीसगढमधील कवर्धा जिल्ह्यातील बैगा या आदिवासी समाजात, लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरा मुलगा वरात घेऊन येतो, त्यावेळी नवरीमुलीची आई वराला दारु पाजते. यानंतर नवरीमुलीलाही दारु पाजण्यात येते. ऐवढेच काय तर संपूर्ण गावातही वाटली जाते. आश्चर्याची बाब म्हणजे गावभर दारु पार्टी दिल्यानंतर सुद्धा लग्नखर्च फक्त २२ रुपये होतो.

बैगा समाजाच्या लग्नविधी पार पाडण्यासाठी भटजी नसतो. या समाजाचा लग्न मंडप हा झाडांच्या पानांनी सजवला जातो. या समाजात लग्नाप्रमाणे दुख:द प्रसंगी दारु पाजली जाते.

Previous Article

२२ मार्च 

Next Article

मुंबई पोलिसांनी कुणाल खेमूला का पाठवलं ई-चलान ?

You may also like