व्हॉटसअॅपसाठी मुलीने पळ काढला

Author: Share:

सध्याची पिढी ही “ऑनलाईन” आहे. सतत सोशल मिडीयावर सक्रीय असते. सतत व्हॉटसअॅपचा वापर करित असल्याने आपल्या पाल्यांनी ओरडा दिल्याने मुलीने घरुन पळ काढल्याचा प्रकार अंबरनाथ येथे घडला आहे.

अंबरनाथ पश्चिम भागात राहणारी अल्पवयीन मुलगी आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत फिरायला गेली होती. फिरुन आल्यावर ती मित्रमैत्रिणींचे फोटो पाहत होती. त्यामुळे मुलीची आई तिच्यावर रागावली. यामुळे त्या मुलीने घरुन धूम ठोकली. ही मुलगी नवी मुंबई येथे एका महिलेला घाबरलेल्या परिस्थितीत सापडली. मुलीने आई-वडिलांकडे जायचे आहे, असे त्या महिलेला सांगितले. या महिलेने त्या मुलीला नवी मुंबई एपीएमसी पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केली असता, ती मुलगी अंबरनाथला राहते, अशी माहीती मिळाली. नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ अंबरनाथ पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी त्या मुलीला तिच्या पालकांकडे सुपूर्द केले.

मात्र व्हॉटसअॅपच्या वापराच्या क्षुल्लक कारणावरुन पालक रागावल्याने घरुन पळ काढल्याने सोशल मिडीयाच्या आपण आहारी तर जात नाही आहोत ना, अशा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

Previous Article

खेकडा चार्जरचा स्फोट, तरुणाने तीन बोटं गमावली

Next Article

घालमेल             

You may also like