Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

माझ्या दुरस्त कन्येस

Author: Share:

नयनात साठलेले हे लोट आसवांचे

ह्रदयात थांबलेले हे गीत भावनांचे…

 

फुलत्या कळीस घाली वारा हळूच साद

“चल गंध दे मला गं: सांगे जणू उगाच

तो रंग गंध आज कण देई अमृताचे…

 

पंखावरी पर्‍यांच्या अडण्यात काळ गेला

हळूवार आठवांना गोंजारी जीव वेडा

मन नित्य स्वप्न पाही हसर्‍याच गोकुळाचे…

 

येशील तू कधी रे परतूनी कोटरास

नभ हो तुला थिटे रे सामर्थ्य ये परास

बांधून आण संगे तू पूंज तारकांचे…

 

वारु मनोरथांचा उधळी कुण्या दिशेला?

सुख-स्वप्न जागृतीचे देई कधी निशेला

प्रभुने पुरे करावे तव स्वप्न अंतरीचे…

 

कविता: सौ. आशा कुलकर्णी

Previous Article

राजकीय कार्यकर्ता

Next Article

कम्युनिष्ठ विचारधारा अन हत्या…

You may also like