नका आई बाबा नका मला मारू,
मी तुमच्या रक्ताचे आहे की हो लेकरू !
नका, नका, नका बनू असे तुम्ही असुरी,
आपल्याच काळजावर चालवता काहो कुणी सुरी !
चला येऊ द्या मला या जगात,
आजी आजोबांची असेन मी लाडकी नात !
नका घेऊ आता कोणतीही आडकाठी,
तुमच्या म्हातारपणाची बनेन मी काठी !
बनेन कोणाची बहीण आणि सून,
करा माझ्या जन्माचे स्वागत हसून !
येण्याआधीच माझे नका करू बंद दार,
तुमच्या ऋणात मी आजन्म राहणार !
द्या देवाच्या दानाला तुम्ही प्रतिसाद,
माझ्या जन्माचा करा, साजरा आनंद !
माझ्या जन्माचा करा, साजरा आनंद !!
महेश रायखेलकर
- Tags: abortion, beti bachaav, girlchild, savegirl