घेतलास तू जन्म…

Author: Share:

घेतलास तू जन्म
जगा उपदेश देण्या
उक्तीआधी कृतीने
आम्हां धर्म शिकवण्या
तुझें ब्रह्मरूप तू दाखवलेस जेंव्हा..

उपकृत झाला भारत..
तुझ्या दर्शनाने तेव्हा..

कंसाचे मर्दन करण्या
तू उगारलीस मूठ जेंव्हा
धर्मापुढेही नाती न यावी आड
शिकविलेस तू तेंव्हा
या स्वधर्माचा अर्थ तू
दाखवलास जेंव्हा
उपकृत झाला भारत..
तुझ्या दर्शनाने तेव्हा..

राधेवरती प्रेम तुझे
आजही आठवती जगी
अन आपल्या प्रियकरात
प्रिया पाहे तुझीच छबी
प्रेमाचा अर्थ तू शिकवलास जेंव्हा
उपकृत झाला भारत..
तुझ्या दर्शनाने तेव्हा..

मदांध जाहल्या सत्तेत
नीर ओढली शीलाची
तिची अब्रू राखण्या
सरसावला पुढे तूच
आजही आम्हां पुरुषांना
तू देतोस जाण कर्तव्याची
पुरुषार्थाचा अर्थ शिकवलास तू जेंव्हा..
उपकृत झाला भारत..
तुझ्या दर्शनाने तेव्हा..

आजही घुमतो मनात आमुच्या
तू शिकवल्या भगवद्गीतेचा नाद
अर्जुनासम आजही आमुच्या
मनी उसळतो धर्माधर्माचा वाद
तुझे अस्तित्व तुझी शिकवण तुझें चरित्र
निष्काम कर्मयोग शिकवते जेंव्हा

उपकृत होतो भारत..
तुझ्या अस्तित्वाने तेंव्हा तेंव्हा..

– महाराष्ट्रपुत्र

Previous Article

राजियांचे मन.. सिंधुदुर्ग १

Next Article

आतातरी आमची दया करा…

You may also like