Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

घालमेल             

Author: Share:

सर, किती वेळ फोन करतोय तुम्हाला , उचलत ही नाहीये ? म्हणून मला आत यावे लागले,

ऑफिस मधला शिपाई आर्त स्वरात बोलत होता

ह बोल, काय आहे रे मधेच तूझे ? जवळ जवळ तो खेकसलाच !

अजित ने समोर असलेल्या आपल्या सेल ला ऑन केल आणि तिरकस नजरेने पहिले त्याकडे.

बोल काय आहे ! काय सुट्टी पाहिजे का कोणी गचकल ? अरे बोल की असा का पूतळ झालाय तुझा ?

एका वर एक होत असलेल्या प्रश्नाच्या भडिमाराने बिचारा थरथरत होता…

साहेब .तुमचा फोन खूप वेळ बंद आहे, ऑफिसमधला पण फोन लागत नाहीये, खूप वेळ प्रयत्न करत होतो लागला नाही,

मग ! पुढे ?, तो गरजला .

साहेब बाहेर दातार म्हणून कोणीतरी मँडम आल्यात खूप वेळ फोन करत होत्या आपल्याला .

दुसऱ्याच् क्षणी त्याचा चेहरा बदलला ,पाठव त्यांना आत, आणि एक !अजून दोन तास कोणी नकोय मला केबिन मधे !समोर अस्ताव्यस्त पडलेली प्रूफ,त्यानं हाताशी असलेल्या ड्रावर ला कोम्ब्ली, पसारा सारखा केला तेवढ्यात अनिता आली, अनिता दातार, संगीत क्षेत्रातल एक नामांकित रत्न —–

या बसा,

अरे तू कधी पासून मला अहो -जहो म्हणायला लागला ? बसताना तिने विचारल.

अग तस नाही, पण.

बर ते जाउंदे,सेल का बंद आहे तूझा ? आज कार्यक्रम होता म्हणून आले होते पुण्यात .

काही नाही ग नेहमीचेच्,

म्हणजे ? ती स्वाती परत आलीय ?

होय स्वाती, स्वाती खामकर ….तो आवेग आवरुन बोलत होता….

चल जाऊ दे तो विषय आपण कॉफी घेऊ मस्त !

त्याने विषय बदलला आणि दोघी ऑफिस च्या बाहेर असलेल्या कॉफी शॉप मधे आले, कॉफी फक्त निमित्त होत, तेव्हढाच ज़रा मनाला चेंज. भरपूर गप्पा झाल्या, ती निःघाली ,त्याने अनिता ला स्वारगेट? ला सोडले, आणि परत ऑफिस ला आला. सहा वाजून गेले होते, त्यानं बॅग भरली आणि तो बाहेर पडला. वाटेत एक विस्तीर्ण झाड होत वडाच् फारशी गर्दी नव्हती, जोडपी, नविन लग्न झालेली जोडपी आपल्या आयुष्यातली गणितच् जणू मांडत होती य सावलीत. तो बसला बॅग मधून डायरि काढली, अजित खूप छान लिहायचा, पण दोन वर्षात एकही शब्द लिहिला नव्हता. लिहायला लागल की उगाचच आठवणी चा गलका व्हायचा —

अस कातरवेळी, अगदी शांत,नीरव शांततेत सगळे काही मागे ठेऊन..वठलेल्या झाडाखाली एकांत करून गप्पा माराव्यात स्वताशी, जमिनीत गाड़लेल्या पारंब्याना पहात उगाचच आपल्या आठवणी ना वाट करून द्यावी, अन गाडुन टाकाव अगदी?  उगाचच  छळ माँडता त या आठवणी, या अशा श्मशान शान्त कातरवेळी, अस वाटत कायमचा बंदोबस्त करावा आणि करता आल च तर आठवणी चे पिंड करून सोडून द्यावेत. पाण्यात कायमचे, अगदी नेस्तनाबूत कराव्या सगळ्या आठवणी अगदी त्यांच्या थडगयाला ही जागा न ठेवता, कायमच्या…. कातडी निबर् करायची आहे आता शेवटचे विधि अन आठवणीचे पिंड दान करून पुन्हा नव्याने जगण्याची आस धरत…..

 

अंधार पडू लागला होता, भवताली असलेल्या वडाच्या पारम्ब्य चा हालत असताना होनारा   आवाज   उगाचच त्याला आपल्या भोवती गुंडालत जाणाऱ्या एक महाकाय अजगरी पाशासारख वाटू लागल.दरदरुन घाम फुटला,घशाला कोरड पडली, आणि तो आकांतान ओरडला !!!!!!! जवळपास  सत्तर एक डोळे त्याच्या कडे रोखून पहात होते, त्यातील एकाने पाणी दिल त्याला !

 

काय झाल ? एक आवाज …..

काही दिसले का इथे ? अस म्हणतात इथे आत्मा भटकतोय एक ! दुसरा एक जीर्ण आवाज …

इतक्यात तो सावरले ! तो निघाला काय ते फक्त त्यालाच माहीत होते.

काय एक एक मानस असतात ! बोलत पण नाहीत .गर्दीतून एक शिष्ट बोलला, जाऊदे नाटकी असेल . कीव्हा वेडा, दुसरा आवाज, जात असताना देखील हे शब्द आघात करून गेले.मनावर

माणस, माणस पण कशी असतात, कोणतीही ओळख नसताना लगेच लेबल लाउन जातात, कसला नि कोणी आधीकार दिला यांना एकाद्या च्या आयुष्याचा तर्क लावायचा ? आपल्या पिवळ्या डोळ्यांनी ? साले पांढर् पेशी —-

तो निघाला एव्हाना घर आले होते, गाड़ी पार्क केली, बेल वाजवायची गरज नसायची, त्याच्या गाडीचा आवाज आला की अर्चना उघडून ठेवायची. तो आला, नेहमीप्रमाणे चहा आला, समोर च्या ई टी मधील उतरता मार्केट चा आलेख त्याला अस्वस्थ करत होता.

मी जरा आराम  करेन मग जेविण.त्याप्रमाणे तू ठरव काय करायच ते.अस म्हणून तो रूम मधे गेला. ती काहीतरी बोलणार इतक्यात दरवाजा मिटला होता —–

 

ती किचन कडे वळली, एव्हाना कूकर दोन शीट्टी देऊन तिसरिच्या तयारीत होता. अनिता परब कोकणकन्या, अगदी देखणी, बेतशिर ऊँची, मद्ध्यम बाँधा, बोलणे पक्के पुणेरी. नावालाच परब बाकी पुरती पुणेकर. काय पहिले मी असल्या विक्षिप्त माणसात ? असला कधी कधी वीचार येइ तिच्यात. पण तिला सर्वकाही माहीत होत. तिने त्याच्या भूतकाळसह त्याला स्वीकारल होत, भूतकाळ कोणाला नसतो ? सगळेच यातून जातत, पण याची चर्चा करण्यापेक्षा यावर कायमच स्वीकार करून उज्वल भविष्य कडे वाटचाल करायला बळ देणे गरजेचे. तेच तीन केल सगल उमजत  असतांना देखील. कूकर नें चौथी शीट्टी दिली. मनातल दाटलेल् अस काढता येत असत तर कूकर च्या शीट्टी सारख … किती बर् झाल असत ना .तिन लगबगीने गँस बंद केला, बाकी सर्व तयार होत आणि त्याला बोलवायला हाक मारली.

घरी दोघच त्याचे आई-वडील गावी.इथे दोघच. पण हा गेल्यावर तिला घर खायला उठायच, नवाच संसार  अवघा चार एक महिन्याचा तिला हे सगळंच तिला नवीन होत. तो आला जेवण करताना शांतता तिला असह्य करत होती. तिनेच विषय काढला.

काय झालय नक्की ?

गेले दोन तीन दिवस पहात आहे अपसेट आहात !

काही नाही. जरा मार्केट शांत  आहे त्याच टेन्शन…. तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आले, शेअर मार्केट म्हणजे आगीशि खेळ, त्यात हा त्यात नवीन. तिच्या भरल्या डोळ्यांत पाहून तो हसत म्हणाला,

इतक काही नाही मार्केट बसले अजून, तू भाजी वाढ छान केलीस आज, आणि बाबांना बोलवत का नाहीस इकडे ? तेवढाच तुला विरंगुळा अन त्यांची पण हवापालट होईल. ओलावलेल्या डोळ्यांनिच तिने होकार दिला. दोघ जेवले. एव्हाना दहा वाजून गेले होते, बेड वर पडताना इतका वेळ ऑफलाईन असलेला तो ऑनलाईन झाला.. ग्रूप ओसंडून वाहत होते, अन अचानक एक मेसेज आला मित्राचा अन इतका वेळ मूड मधे असलेला त्याचा चेहरा बदलला,

त्याच्या भरल्या डोळ्यांनिच सगळे कळत होत.

 

अनिता !

अनिता स्वाती ——-

तो काहीच बोलू शकला नाही पुढे —

अनिता स्वाती…. गेली ..कायमची !!!

अनिताला काय कराव सुचेना ती मटकन खाली बसली, डोळ्यासमोरून स्वाती जाईनाच झाली.अगदीच अकल्पित सार, स्वाती सकाळीच ऑफिस मधे आली तेव्हा सगळा प्रकार लक्षात यायला पाहिजे होता अजित च्या. नाहीतर उभ्या त्यांच्या पाच वर्षाच्या सहवासात कधीच ऑफिस ला न आलेली स्वाती आजच ऑफिस ला का यावी स्वाती आज सकाळीk आली तेव्हा खर तर तो आणि शिपाई यांखेरीज कोणीच आलं नव्हत , ती आली.

काही सेकंद निरवशांततेत गेली,

अजित ..काहीच बोलणार नाहीस का ? इतक परक केलस ?

एवढ होऊन हिं मला मला साधी कल्पना हिं दिली नाहीस ? अजय ……

बंद कर तूझ हे नाटक !

आणि मी का म्हणून सगळ सांगायच ? आणि तू आहेस तरी कोण …..?

तुला कल्पना नसेल सगळ्याची. तूझ्या फक्त एका एका चुकीमूळ …. उध्वस्त झालो मी …खूप खूप संयम राखून सहन केले सगळे …आणि आत्ता कुठे सावरत होतो तर पुन्हा परवा तुझा आलेला घरी फोन …..का का इतकी  राख रांगोळी केलीस ….अजून काही बाकी आहे का ??तिच्या डोळ्यांतूंन पाणी वाहत होत,

अजित तुला सकाळी एक मेल केलाय …. वाच जमले तर … काहीच न बोलता ती उठली आणि केबिन बाहेर पडली ….

 

शिपाई आत आला …. त्याने पाणी ठेवले ….उभ्या आयुष्यात साहेबाला इतक संतापलेले कधीच पहिले नव्हत … काही जखमाच अशा असतात की त्या कधी भरतच नाहीत, उसवत जातात अगदी गुंता होईपर्यंत

 

आता निघण भाग होत, बारा वाजत आले होते, तो उठला,

अनिता, मी सगळ उरकूनच येतो ….

अहो मी पण येते, अग अर्धी रात्र होतेय नको येऊ जातो मी …

पण ती ऐकेल तर शपथ ..

दोघ निघाले,तस पाहिले तर तासभर अंतर दोन घरात,पण गेली दोनेक वर्ष तिकडे पावले वळलीच नाहीत …..आणि आता आज हा क्षण …डोक्यात काहूर माजले होते, नक्की काय पहायला मिळणार होत …तिथं

घरासमोर गर्दी, दबडबलेले डोळे सगळेच.दोघ आत आले . आत एक कलेवर होत…

पोर दहा मिनीटात येते म्हणाली आणि…….तासभरात आलं ते तीच ..तीचा बाप हळवा होत होता बोलतांना …अहो काहीच चूक नसतांना ..

 

दुपारी एका फ्लायओव्हर वरून जात असताना …तिच्या गाडी ला मागून येणाऱ्या ट्रक ने उडवले होते ….. दोन मिनीटात सगळ होत्याच नव्हत झाल होत ……पोलीस आले सगळे सोपस्कार झाले, ट्रक वाला पळून गेला …..एका हसत्या खेळत्या जिवाचे पोस्टमाrtm झाले …..संपले सार …. सगळ उरकून तो आला. अनिता तिच्याच घरी होती …..एव्हाना गोतावळा पांगला होता …..तिची आई , अनिता आणि जवळच राहानारे लोक होते …..सगळ्याना धीर देऊन दोघ निघाले ..एक दोन वाजून गेले होते, सकाळी लवकर ऑफिसला  जायच होत …. झोप काही यायला मागत नव्हती ..चुकलंच आपल ….जरा वेळ थांबली असती ऑफिस वर तर …माझ्या बोलण्या चे टेन्शन तर नसेल घेतल ना तीन ? एक ना हजार प्रश्न ….त्यात आठवणीनि काहूर माजलेल ….अनिता केव्हाच झोपुन गेलीली ….

 

लेपटॉप चालू केला….आज आलेल्या अनेक मेल मधे एक मेल तीचा होता …..शेवटची आठवण जणू काही तिला माहीतच होत सगळ …..

 

खर तर तुला प्रिय म्हणू की ….तो अधिकार नियतिनच हिरावून घेतला माझ्याकडून …सगळच अनवट वयात आणि …….या पत्राला मुळात उत्तर येईल अशी अपेक्षाच नाही. सगळीच ओझी आता उतरून टाकायची आहेत ..जड़ जात कधी कधी या आठवणी आणि भावनांची ओझी मानगुटिवर घेऊन फिरताना, तेंव्हा सगळीच ओझी दूर झालेली बरी. ती वेळच फसवी  होती. तूझ माझ्या वर नितांत प्रेम होतच रे, ते मान्य करतेच मी, कितिक भेटीत हळवा होतांना पहायलय मी तूला ……

आठवत तुला …सहज म्हणून मी म्हणले होते ….मी लग्न करतेय …. तू काहीच बोलला नाहीस ….फक्त मौन ……अरे वेड्या फक्त तीच वेळ होती ज्या वेळी फक्त एका शब्दाने सारे अर्थ बदलले असते ….. तू फक्त विस्कटत गेलास ….मी खूप दिवस वाट पहिली ….अगदी शेवटच्या क्षणा पर्यत …खूप ….आणि इथूनच वाटा वेगळ्या झाल्या आपल्या ….. लग्न     कुणाकडून तरी कळलं तु लग्न केलस म्हणून ….अन शेवटची…….आशा सम्प्ली.

 

अरे ऐक ना लग्न खरच करतेय आत्ता मी …मुलगा खूप चांगला आहे समजुतदार …बेंगलोर ला असतो …बाबांना आवडला , त्यांना एव्हढंच एक लग्न आणि संसार  पहायची इच्छा आहे..

 

थकलेल्या डोळ्यांनी जुळवून  पहात राहयचे  ते कुंडल्या ….पहावंत नव्हत सार …दिला मग होकार आणि डील फायनल केल.

पुढच्या वेळी येताना त्यालाच घेऊन येईल …भेटू

तुझीच

 

काय हे ….अस म्हणत तिने लॅपटॉप बाजूला केला अन त्याला उठवायला गेली ..

पत्र वाचल, काही वेळ तो ब्लँक झाला …आता सारे संदर्भ उघडू लागले होते ….. आपण त्याच वेळी व्यक्त व्हायला हव होत …वेळच चुकली सगळे अखाड़े चुकत गेले …दोष कुणाचा ही नव्हता ..फक्त वेळच फसवी होती …त्याला कधी झोप लागली कळलीच नाही .सकाळी अनिता ला जाग आली तेंव्हा हा झोपलेला आणि लॅपटॉप तसाच सूरु छातीवर ….

 

काय हे ….अस म्हणत तिने लॅपटॉप बाजूला केला तो झोपेत होता . आनिताने लॅपटॉप ओपन तसाच मेल समोर होता तीचा … ती वाचतच राहीली ….अनिता किती उशीर मला उठवायचे नाही का ?

त्याचा आवाज आला आणि तिची भानावर आली ….लॅपटॉप बाजूला ठेवला आणि ती चहा साठी उठली ..त्याने आवरले आणि तो ऑफिस ला निघाला ..

अजित ..तिच्या आवाजात संशयाचा सुर होता. नक्की कुठपर्यंत पोहोचला होता तुम्ही ?

काय बोलतेय तू ?

मी मेल वाचलाय …..

आपण संध्याकाळी आल्यावर बोलू …त्याने विषय टाळला आणि तो बाहेर पडला .अनिता ला काही सुचत नव्हत, डोक्यात थैमान घातल होत . डोक्यातून मेल जात नव्हता . दिवस  असाच गेला .

अजित आला, अनिता उठली .तिने चहा केला .काही वेळ शांततेत गेला .

 

काय झाल ..इतका का इशु करतेय तू …

उगाच काहीतरी बोलू नको तू समजते तस काही नाही.

तस काही म्हणजे ..काहीतरी आहेच …अनिता कडाडली . आतापर्यंत फक्त मला संशय होता पण आत्ता खात्री झालीय ….ती नक्की कशाला आली होती ऑफिसात ?आणि त्याच दुपारी कशी मेली ?

तुम्हीतर …..नाही ना ?

अनिता, बास ! आता एकही शब्द ऐकून घेणार नाही मी आता .खूप ऐकलं .खूप सहन केल आता असह्य होतेय सार …मी तुला सार  सांगितले आहे यापूर्वी … आणि काही करायच असतच तर कधीच केल असत .. मला कोणत्याही गोष्टी ची अथवा स्पष्टीकरणाची गरज नाहीये . मला सगळ कळलेय . आणि ती तिच्या रूम मधे निघून गेली .

अजितला स्वप्नात देखील वाटल नव्हत की आपला भूतकाळ असा आपला जीवघेणा ठरेल …

सगळच अनाकलनीय होत त्याच्यासाठी …अकल्पित.नंतरचे काही दिवस असेच गेले .फक्त तडजोड म्हणून राहत होती ती त्याच्याबरोबर.खूप समजावुन सांगायचा प्रयत्न केला त्यानं पण उपयोग नव्हता.नातं  तडकल होत  आता जोडण्यात अर्थ नव्हता .  नुकताच बहरत आलेला तीचा संसार कोलमडून पडला होता .किती दिवस राहणार होते घुसमटत मनातल्या मनात.तिला काहीच सुचत नव्हत …आणि त्याच्या पासून दूर जाण ही अशक्य होत . तो घरी आला, तिने चहा केला .

अनिता थांब …बोलायच आहे तूझ्याशी . अनिता काहीच बोलली नाही .

हे बघ ..मला पुसटशी कल्पना ही नव्हती या सगळ्याची, आणि तीच परत येणं जस तुला तस मलाही अनपेक्षित होत .

पण तो मेल ?

अग तो मेल तिन केलाय, आणि तो पण दहा एक दिवसापुर्वी …कामाच्या गडबडीत मी ही पहिला नाही .

जे झाल ते झाल मला माझ्या भूतकाळाची सावली , आपल्या सुखी संसारावर् येऊन नाही द्यायची . तू समजुतदार आहेस .आशा आहे समजून घेशील..ती काहीच न बोलता निघून गेली आपल्या रूम मधे .रात्री पण जेवताना फारशी बोलली नाही.

दिवस उजाडला , तो झोपेत होता तोच खाली बाहेर कसला तरी आवाज आला .बाहेर येऊन पाहतोय तर काय अनिता .बॅग भरून तयार होती .बसली होती .त्याला काहीच कळेना,

अनिता याचा अर्थ काय ?इतक काय अस झालय की तू घर सोडून चालली आहेस ?

अनिता शांत पणे म्हणाली.

तुझी पण बॅग भरलीय,आत आहे …आपण दोन दिवस फिरुन येऊ कुठेतरी ….

मी चुकले अजित ….काही क्षण वहावत गेले …माफ कर मला .

अग वेडी आहेस का तू ?

माफ काय करायच त्यात .दे सोडून सगळ …एवढ बोलला आणि तो फ्रेश व्हायला निघून गेलाही .

हरवून चाललेला सुर पुन्हा गवसला होता. समज गैरसमजा चे मळभ दूर झाल होत .मनातली सल दूर झाली होती .  एका वादळ शमल होत कायमच,  आणि एका नविन पर्वाची सुरवात झाली होती पुन्हा नव्याने ……

 

विनय श्रीकांत गदो

 

 

 

Previous Article

व्हॉटसअॅपसाठी मुलीने पळ काढला

Next Article

शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांची आज पुण्यतिथी

You may also like