Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

जनरल अरुणकुमार वैद्य

Author: Share:

जन्म : २७ जानेवारी १९२६ – मुंबई
मृत्यू : १० ऑगस्ट १९८६ – पुणे

भारतीय सैन्याचे जनरल म्हणून निवृत्त झालेले अरुणकुमार वैद्य, मराठी माणसाचा अभिमान आहेत. त्यांच्या नावे पाकिस्तानसोबतच्या १९६५ आणि १९७१ मधील युद्धे, ऑपरेशन ब्ल्यू स्टार असे अनेक पराक्रम आणि सैन्यासाठी त्यांनी केलेले अतुलनीय कार्य याचा फार मोठा खजिना आहे. यासाठी त्यांनी दोन वेळा महावीर चक्र, एक वेळा परम आणि विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके मिळाली Aआहेत. 

त्यांचे वडील अलिबागचे कलेक्टर म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण इंडस्ट्रीज हायस्कूल अलिबाग येथे झाले. कॉलेज शिक्षण एलफिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. 

शिक्षण चालू असतानाच सैन्यात जायची त्यांना विलक्षण ओढ होती. १९४४ साली त्यांना इमरजन्सी कमिशन तर ३० जानेवारी १९४५ ला त्यांना पर्मनंट कमिशन मिळाले. 

१९६५ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात खेमकरण येथे त्यांनी मोठा पराक्रम गाजवला.  पाकिस्तानची सशस्त्र पलटण आत घुसली होती. तेंव्हा घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करून पाकिस्तानचे एम्४७ व एस्४८ हे प्रचंड पॅटन रणगाडे त्यांनी खिळखिळे करुन टाकले.  ६ सप्टेंबर १९६५ रोजी या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना महावीरचक मिळाले.

नंतर त्यांची बदली त्रिपुरा, आसाममध्ये नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याकरता झाली. तिथेही त्यांनी नागांचा प्रमुख मोबू अंगामी सहित इतर सशस्त्र नागांना पकडले. १९७१ सालच्या पाकिस्तान युद्धवेळेस सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुख म्हणून वसंतार नदीवर पाकिस्तानचे सैन्याशी अतुल लढाई दिली. 

१ ऑगस्ट १९८३ रोजी भारताचे सरसेनानी म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली.१ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६ पर्यंत ते जनरल या हुद्यावर भारतीय लष्करप्रमुख  होते. तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी केले.  

१० ऑगस्ट १९८६ रोजी त्यांची निघृण हत्या करण्यात आली. 

या मराठी शूरवीरास सर्व महाराष्ट्रातर्फे “स्मार्ट महाराष्ट्र” आणि प्रबोधक तर्फे मानाचा मुजरा!

Previous Article

पंडित विष्णु नारायण भातखंडे जन्मदिवस-१० ऑगस्ट १८६०

Next Article

महामुंबईत मराठयांचा शिस्तबद्ध एल्गार! विधानसभेचाही सकारात्मक प्रतिसाद 

You may also like