गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुंबई मराठी पत्रकार संघाकडून निषेध

Author: Share:

मुंबई: निर्भिड पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड हत्येचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वाबळे यांनी म्हटले आहे की, ‘गौरी लंकेश पत्रिके’ या साप्ताहिकाच्या संपादिका असलेल्या गौरी लंकेश या निर्भिड आणि परखड लिखानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या या लिखानाने पिसाळलेल्या माथेफिरु प्रवृत्तीनेच त्यांचा बळी घेतला असावा असे दिसते. एका असहाय्य महिलेला एकांतात गाठून तिची निर्घूण हत्या करणे यासारखा दुसरा भ्याडपणा कोणता असू शकतो? पण व्यक्ती मारल्याने विचार मरत नसतात.

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी ह्यांची हत्या करणारे आरोपी अद्यापही मोकाट असताना गौरी लंकेश यांची झालेली हत्या धक्कादायक आहे. या हत्येची कसून चौकशी करुन आरोपींना त्वरीत गजाआड करावे अशी आमची मागणी आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ या भ्याड हत्येचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.

Previous Article

हायकू स्पर्धा २०१७; स्वलिखित हायकू आम्हाला पाठवा

Next Article

फरक

You may also like