Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

गौरी गणपतींचे कोकणात थाटामाटात विसर्जन

Author: Share:

महाराष्ट्राचे लाडके दैवत आणि विशेषतः कोकणात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणपतींचे आज गौरी गणपती विसर्जन दिवशी (सात दिवसांचे गणपती) थाटामाटात विसर्जन करण्यात आले. शहरातील कोलाहल, बँड ताशा, डीजे आणि फटाक्यांपासून दूर, भजनाच्या मंगलमय वातावरणात आणि टाळ मृदूंगाच्या घोषात गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले, तेंव्हा सर्व कोकणवासीयांचे डोळे पाणावले. पुढच्या वर्षी लवकर येईन असे आश्वासन  देऊन मंगलमूर्ती समुद्राच्या गंभीर पाण्यात मावळत्या सूर्याच्या साक्षीने दिसेनासे जाहले.

गणपतीचा उत्सव कोकणचा अतिशय  लाडका उत्सव आहे. तसे सर्वच उत्सव कोकणात पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. मात्र गणेशोत्सव हा अतिशय प्रिय! एक तर, गणेश हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आणि सर्वांना लळा लावणारा बाप्पा! आणि दुसरे म्हणजे, नोकरीधंद्यानिमित्त कोकणातील मूळ मातीपासून दूर मुंबई पुण्यात असणारी चाकरमानी ह्या सणासाठी गावात एकत्र येतात. बाप्पा, उत्सव, आपली माणसे, गोड-धोड उत्साह यांनी नुसते कोकणातील घर भरून जाते. बऱ्याचदा वर्षातून एकदाच येणाऱ्या आपल्या मुंबईतील माणसांचे आणि बाप्पाचे किती करू आणि किती नको असे कोकणवासीयांना होऊन जाते.

त्यामुळे गणपती म्हटला की, कोकणवासी मग तो मुंबईत राहणारा असो वा कोकणात, हळवा होऊन जातो. कधी बाप्पांचा उत्सव येतो असे होते. आणि मग जेंव्हा तो येतो, तेंव्हा एक दोन दिवस आधीच गाडी किंवा एसटी करून कोकणात पळतात. मग पाच दिवस नुसती धम्माल असते. बाप्पाला आल्यापासुन, मखरात किंवा देव्हाऱ्यात बसवल्यापासून, चतुर्थीचे मोदक, दीड दिवसाच्या गणपतीसाठी समुद्रकिनारी, आधी एखादी पूजा, मग गौराई, मंगळागौर, पूजन आणि बाप्पा जाण्याचा दिवस आला कि पुन्हा कोकणवासी हळवा होतो. कोकणात, काही गणपती दीड दिवसांनी निघत असले तरी उरलेले सर्व गणपती गौरींसोबतच निघतात.

पहा, गणपती विसर्जनाची काही दृश्ये श्रीवर्धन वरून, आणली आहेत प्रज्ञा माने यांनी!

Previous Article

१ सप्टेंबर

Next Article

मुंबईतील सर्वात मोठा नवरात्रौत्सव; “रुपारेल नवरात्री उत्सव २०१७”साठी “दांडिया क्वीन” फाल्गुनी पाठक सज्ज

You may also like