Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

गणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग २

Author: Share:

ओम एकदंताय नमः
एकदंत हे हत्तीच्या चेहर्यावरील एका सुळ्याशी संदर्भित आहे. याचा अर्थ असा की देव द्वंद्व तोडून टाकतो आणि तुम्हाला एकल दृष्टी प्रदान करतो. ज्याच्याकडे मनाची एकाग्रता आणि एकल दृष्टी आहे, तो सर्वकाही साध्य करु शकतो.

ओम कपीलाय नमः
कपील म्हणजे तुम्ही रंग उपचार पद्धती देण्यास सक्षम आहात. तुम्हाला तुमच्या भोवती किंवा इतरांच्या भोवती रंग निर्माण करता येऊ शकतो. त्यांना या रंगात न्हाऊन काढा आणि बरे करा. ज्या प्रकारे तुम्ही मंत्र तयार कराल त्या प्रकारे तुम्ही रंग तयार करु शकाल. याचा दुसरा अर्थ असा आहे की “गायीची इच्छा करा” “पुष्कळ गायी”, म्हणजेच तुम्ही जे काही मागाल ते सत्य होईल. तुमच्या आत एक इच्छा निर्माण करणारी गाय, तुम्ही जे काही इच्छिता, विशेषतः दुसर्यांना बरे करणे, अशी इच्छा लगेच सत्यात उतरतात.

ओम गजकर्णकाय नमः
गणेशाचे, हत्तीचे कान सतत पंख्यासारखे हलत असतात. याचा अर्थ असा की लोक पुष्कळ चर्चा करतात पण तुमच्या आत जे महत्वाचे आहे ते सोडून बाकी काहीच जात नाही. याचा असाही अर्थ आहे की तुम्ही कुठेही बसा आणि हा वैश्विक दुरदर्शन (शरीर) सात चॅनलने (चक्र) स्वरबद्ध करा आणि सर्व ७२ नाड्या, याद्वारे कुठल्याही लोकात तुम्ही जाऊ शकता व पूर्वज, देवदूत, देवाचा किंवा प्रेषिताचा आवाज तुम्ही ऐकू शकतात. या मंत्राद्वारे तुम्ही अंतरदृष्टी प्राप्त करु शकतात.

ओम लंबोघराय नमः
याचा अर्थ असा की तुम्हाला असे वाटेल की हे ब्रह्मांड म्हणजे तुम्ही स्वतः आहात. याचा अर्थ असा की सबंध ब्रह्मांड तुमच्या आतच आहे. जसे संपूर्ण झाड हे एका बीजात आहे. संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती ओम या नादाने झाली आहे आणि तुमच्यात असलेली ओम चेतना, तुम्ही ब्रह्मांड आहात असे सुचीत करते. म्हणजेच जर तुम्ही ब्रह्मांडाशी एकत्व साधून दररोज असे म्हणालात की जगाला “शांती” प्रदान कर, तर देवाची कृपा होईल आणि विश्वात व ब्रह्मांडात शांतता नांदेल. ओममध्ये ब्रह्मांड आहे आणि ओम तुमच्यात आहे.

ओम विकताय नमः
म्हणजे जगाला स्वप्न किंवा नाटक म्हणून पाहणे. जेव्हा तुम्ही उच्च चेतनेत असता, तेव्हा सबंध विश्व स्वप्नासारखं भासतं. आपण केवळ आपली भुमिका बजावत आहोत. आपण स्वीकारलेल्या भुमिकेनुसार आपल्याला पत्नी किंवा पती किंवा मुले किंवा नागरिक यांचि भुमिका साकारायची आहे. रंगमंचावर जेव्हा एक नाग अभिनेत्याला दंश मारतो तेव्हा सर्व प्रेक्षक रडतात, पण जो मुलगा पहूडला आहे, त्याला माहित आहे की हा खरा नाग नव्हता आणि आपण मेलो नाहीत. या वस्तूंच्या जगात जीवन निश्चितपणे केवळ एक नाटक आहे, अहंकाराचे हे भौतिक जग एक नाटक आहे. पण आतमध्ये, तो रंगमंचावरील मुलगा जो नागाने चावल्यानंतरही आपण मेलो नाही म्हणू खुश आहे, त्याच प्रमाणे आपल्यातील सत्य कधीच मरत नाही. म्हणून तुम्ही इतर सर्वकाही नाटक समजता. या मंत्राला जाणल्यानंतर ही चेतना तुमच्यात निर्माण होते.

ओम विघ्न नाशनाय
तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या कामातील अडथळा दूर करण्यास देवाचा धावा करणे. या मंत्राला सातत्याने जाणून घेतल्यास तुमच्यातही असलेले अडथळे आणि अवरोधित ऊर्जा मुक्त होते.

ओम विनायकाय नमः
विनायक हे सुवर्ण युगातील गणेशाचे एक नाव आहे. या मंत्राला जाणल्यानंतर तुमचे आयुष्य सुद्धा सुवर्ण युग बनते. तुमच्या कार्यालयात, तुमच्या कामाचे तुम्ही स्वतः मालक असाल. विनायक म्हणजे काहीतरी नियंत्रणात असणे. विनायक म्हणजे समस्यांचा प्रभु.

ओम धुम्रकेतुवे नमः
धुमकेतूला वेदांमध्ये धुम्रकेयू म्हटले आहे. ज्यावेळेस धुमकेतू पृथ्वी आणि इतर ग्रहांवर दिसतो तेव्हा भय आणि दहशतवादाचे वातावरण असते. मार्गदर्शक गुरु आणि ज्याच्याकडे त्याला तोंड देण्याचे शहाणपण आहे, ते सर्व उच्च विश्वात जातात. महत्वाचे लोक त्यावेळी मरतात आणि रक्तपात होतो आणि अन्य अनेक समस्या उद्भवतात. यावर मात करण्यासाठी, आपल्यासाठी हे महत्वाचे आहे की जगाच्या शांतीसाठी हा मंत्र लक्षात असला पाहिजे.

ओम गणध्यक्षाय नमः
हा मंत्र अतिशय महत्वाचा आहे. समजा की तुमच्याकडे एक गट, देश, शेजारी कींवा कुठल्याही प्रकारचे गट उपचार, गटांना बरे करणे किंवा संपूर्ण देशाला बरे करावयाचे आहे. तर तुम्हाला त्या संपूर्ण गटाला तुमच्या मनाच्या रिंगणात आणावे लागेल आणि हा मंत्र म्हणावा लागेल. या मंत्रा द्वारे गट बरा होऊ शकतो.

ओम भालचंद्राय नमः
संस्कृतमध्ये, भाल म्हणजे मस्तिष्क केंद्र. चंद्र म्हणजे चद्रकोर. भालचंद्र म्हणजे असे चक्र जेथून अमृत ठिबकत राहते. हे सर्व उपचाराचे गुपीत आहे. येथे स्वतःला शिव समजायचे आहे. स्वतःला सत्य समजणे आणि तुम्ही चंद्रकोर घेतले आहे अशी कल्पना सतत करत रहा. चंद्रकेर हे मधू आणि शांतीचे प्रतीक आहे.

ओम गजाननाय नमः
याचा अर्थ तुमच्या शिराऎवजी हत्तीचे शिर बसवणे. याचा अर्थ अहंकार कापला गेला आणि त्याच्या जागी ओम ठेवण्यात आले. म्हणजेच तुमचे मस्तिष्क अनंत चेतनेने भरलेले आहे.

Previous Article

गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी दादर स्टेशन जवळ मध्यरात्री लोकांचा असा उत्साह होता…

Next Article

२६ ऑगस्ट

You may also like