गणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग १

Author: Share:

गणपतीचे मंत्र हे सिद्धि मंत्र आहेत. प्रत्येक मंत्रात भगवान गणेशाची विशिष्ट शक्ती सामावलेली आहे. योग्य प्राणायमाद्वारे (तालबद्ध श्वास) आणि प्रामाणिक भक्ती केल्यास उत्तम परिणाम साध्य होईल. साधारणतः गेणेश मंत्र सर्व वाईट शक्तींना मारक ठरेल आणि भक्ताला भरपूर प्रमाणात विवेक आणि यश प्रदान करेल. जिथे गणेश मंत्राचे पठण होते तिथे वाईट शक्ती घरात किंवा मनात शिरकाव करु शकत नाही.

अजून एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की मंत्र पठण करण्याआधी प्रत्येकाने आंघोळ किंवा हातपाय धुऊन बसावे. प्रत्येकाने मंत्र पठणास सुरुवात करण्याआधी तीन किंवा अधिक वेळा प्राणायम करावे. कमीतकमी एक माळ किंवा १०८ वेळा मंत्र पठण करावे. जेव्हा हे दृढ तासात आणि जागेत नियमितपणे ४८ दिवस केल्यास, याला उपासना म्हणजेच प्रखर चिंतन म्हटले जाते, ज्यामुळे सिद्धि किंवा अध्यात्मिक शक्ती उत्पन्न होईल. एक चेतावनी अशी देण्यात येते की एखाद्दाने या शक्तीचा वापर आजारी माणसाला बरे करण्यासाठी आणि निस्वार्थीपणे मानवजातीच्या कल्याणासाठी करावा. या शक्तीचा दुरुपयोग करु नये. शक्तीचा दुरुपयोग केल्याने देवाचा अभिशाप होऊ शकतो.

ओम गं गणपतये नमः

हा गणपती उपनिषदातील मंत्र आहे. प्रवासाची सुरुवात करण्याआधी, शाळेतील नवीन अभ्यासक्रम, नवीन कारकिर्द किंवा नोकरी, किंवा नवीन करार किंवा व्यवसाय सुरु करण्याआधी या मंत्राचा वापर करावा. जेणेकरुन अडथळा दूर होईल आणि तुमच्या परिश्रमाला यश लाभेल.

ओम नमो भगवते गजाननाय नमः

हा अतिशय भक्तीपर मंत्र आहे, ज्यात गणेशाची सर्वव्यापी चेतना सामावलेली आहे. हा मंत्र गणेशाचे दर्शन घेण्यासाठी किंवा एक व्यक्ती म्हणून त्याची उपस्थिती अनुभवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे.

ओम श्री गणेशाय नमः

हा मंत्र सहसा सर्व मुलांना त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी शिकवला जातो. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि ते त्यांच्या परिक्षेमध्ये यशस्वी होतील. अर्थातच, कुठल्याही वयातील व्यक्तीद्वारे त्यांच्या शाळेतील किंवा विद्यापीठातील नवीन आभ्यासक्रम घेत असताना आणि डिग्री घेताना यश प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा वापर होऊ शकतो.

ओम वक्रतुंडाय नमः

गणेश पुराणात दिल्याप्रमाणे हा मंत्र पुष्कळ शक्तीशाली आहे. जेव्हा व्यक्तीगत किंवा सर्वत्र, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीतरी योग्यरित्या होत नसेल किंवा जेव्हा लोकांचे मन वक्र किंवा नकारात्मक होतात, तेव्हा त्यांचा मार्ग सुरळीत करण्यासाठी, या मंत्राद्वारे गणेशाचे लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते. हम म्हणजे ” माझ्या प्रभु, मनाचे वक्र मार्ग सुरळीत करण्यासाठी विलंब करु नकोस”. दैत्यांच्या अत्याचारांवर अंकूश ठेवण्यासाठी गणेश पुराणात हा मंत्र अनेकदा वापरला गेला आहे. याव्यतिरिक्त, कुठल्याही पाठीच्या कण्याच्या कमतरतेवर जसे की मणका किंवा अवयवात आलेल्या वक्रतेवर या मंत्राचा वापर होऊ शकतो. अशी कमतरता बरी करण्यासाठी किंवा सुरळीत करण्यासाठी १००८ वेळा या पवित्र शब्दाचे पुनरुच्चारण करा.

ओम क्षिप्र प्रसादाय नमः

क्षिप्र म्हणजे क्षणार्थात. जर कोणताही धोका किंवा काहीतरी तुमच्या मार्गात येत असेल आणि तुम्हाला त्या समस्येशी कसे लढावे हे कळत नसेल तर खर्‍या भक्तीने या मंत्राचा जाप केल्यास तत्काळ कृपाप्रसाद मिळतो.

ओम श्रीम ह्रिम क्लिम ग्लौम गं गणपतये

वर वरदा सर्व जनमई वशमनाय स्वः

या मंत्रात अनेक बीज (बी) मंत्र आहेत. इतर गोष्टींप्रमाणेच, “तु माझ्यावर कृपार्शिवाद कर, मी तुला माझा अहंकार देतो” असा याचा अर्थ आहे.

ओम सुमुखाय नमः

या मंत्राला पुष्कळ अर्थ आहे. परंतु सोपे करण्यासाठी, या मंत्राचे ध्यान करुन नेहमी तुमचा अंतरात्मा, चैतन्य, चेहरा आणि सर्वकाही सुंदर असेल, अतिशय सुखकारक शिष्टाचार आणि सौंदर्य तुम्हाला लाभेल. असा याचा अर्थ आहे. यासोबत तुमच्या डोळ्यात शांती निर्माण होईल आणि तुम्ही जे शब्द उच्चाराल ते प्रेमाच्या शक्तीने भरलेले असेल.

क्रमशः

Previous Article

मेसेंजर ऑफ गॉड निघाला मेसेंजर ऑफ इव्हील; अनुयायांची गुंडगिरी.

Next Article

कोकणातील काही प्रसिद्ध गणपती

You may also like