युवा फाऊंडेशन ने श्रींची आरती केली स्त्रीच्या हस्ते

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – घामाच्या पराकष्ठाने तिने आनंदाची पालवी फुलवली. धैर्याने स्वप्न साकारण्याची मुहूर्तमेढ तिने रोवली. कणखरतेचे प्रतीक असलेल्या स्त्री शक्तीचा जागर झाला. युवा फाऊन्ड़ेशन विघ्नविनायक राजा गणेश मित्र मंडळ नांदगांव आयोजित ‘श्री’ ची आरती ‘स्त्री’ च्या हस्ते विविध क्षेत्रातील आपल्या कर्तृत्वाने व नेतृत्वाने तालुक्याचे महिला व मुलीच्या हस्ते पार पडली या वेळी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ शैक्षणिक वर्ष दत्तक योजने अंतर्गत दोन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक गणवेश वाटप करण्यात आले व तसेच एक वृक्ष एक मित्र संकल्प आयोजित उपस्थित मान्यवराना आवळा वृक्ष देण्यात आले.

यावेळी नांदगांव नगरीच्या उप-नगरअध्यक्ष शोभाताई कासलीवाल जि.प.सदस्य न्यायडोंगरी गट कु.अश्विनी ताई आहेर सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्मिता दंडगव्हाळ शिक्षीका सौ. अलका नारायणे मॅडम. शिव कन्या संगिता सोनवणे, महिला पोलिस कर्मचारी, कराटे खेळाडू शिवानी इघे, मुलींचा हॉलीबॉल संघ ज्या संघातुन महाराष्ट्र संघाच्या खेळाडू घडल्यात अशा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगीरी करणाऱ्या महिलांच्या   उपस्थित श्रींची आरती करून या मंडळाने समाजाला नवा आदर्श घालवुन दिला.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

श्री निलमणी महागणपती पार्थिव मुर्ती विसर्जन महामिरवणुक 2017

Next Article

साहेबराव बारवकर यांचे विहिरीत पडल्याने निधन

You may also like