Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी दादर स्टेशन जवळ मध्यरात्री लोकांचा असा उत्साह होता…

Author: Share:

गणपती हा जणू लोकांचा जीव की प्राण… गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर नेहमीच उत्साही असतात. हा उत्साह गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीही दिसून आला.

दादर स्टेशन मध्यरात्री झोपी जातं. पण गणपतीच्या आगमनासाठी मात्र लोकांची एकच गर्दी होती. लोक मध्यरात्री खरेदी करत होते. मकर, गणेश मूर्ती, सजावटीसाठी साहित्य अशा गोष्टींची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उमटली होती. हा फोटोंमध्ये तुम्ही क्षणचित्रे पाहू शकता की कशाप्रकारे लोक मध्यरात्री सुद्धा उत्सूक होते. ही उत्सकता होती बाप्पाच्या आगमनाची…

पुरुष, स्त्रीया सोबत लहान मुले सुद्धा खरेदी करण्यात मग्न होते. हे फोटो आहेत आयडीयल दुकानाच्या शेजारचे… आयडीयल दुकानाची जी गल्ली आहे, तिथे नेहमीच गर्दी असते. कारण रोज उपयोगी पडणार्‍या वस्तू तिथे मिळतात. तसेच ती खाऊ गल्ली म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. आता तर गणेशोत्सवाचं वातावरण म्हणजे गर्दी दुप्पटच आणि आनंद व उत्साह सुद्धा दुप्पट. शेवटी गणपती म्हणजे जीव की प्राण…

बोला गणपती बाप्पा मोरया…

Previous Article

२७ ऑगस्ट

Next Article

गणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग २

You may also like