Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

गणपती बाप्पा मोरया

Author: Share:

गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला. गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले. जगात कोठेही होत नाहीत तेवढे उत्सव या देशात होतात आणि हेच या देशाचे सौंदर्य आहे. माणूस हा जसा सामाजिक प्राणी आहे तसाच उत्सवप्रियही आहे. भारतीय माणूस कितीही गरीब असला तरी आपल्या पद्धतीने तो आपली परंपरा जोपासतो. याच उत्सवप्रियतेने आपण आपल्या परंपरा जोपासल्या आहेत.

टिळकांनी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आज महाराष्ट्राची शान झाला आहे. काहीजण हा विषय भाऊसाहेब रंगारी विरुद्ध लोकमान्य टिळक असा जोडतील. आपल्याला या वादात जायचे नाही. राजकारण्यांवर आपण हा विषय सोडून देऊयात. कारण त्या बिचाऱ्यांचे पोट यावर चालते. आणि कोणाच्या पोटावर पाय देण्याची माझी इच्छा नाही. पण टिळकांमुळेच सामान्य माणूस गणेशोत्सवाच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध उभा राहिला हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.

पण ज्या कारणांमुळे हा उत्सव सार्वजनिक झाला जर ते कारण संपले ना ? मग हा उत्सव अजूनही साजरा हा होतोय हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. कारण आपल्याला या उत्सवाची गरज आहे. ब्रिटिश विरोधात असलेली लढाई संपली. पण खूप सारे सामाजिक प्रश्न अजूनही आहेत. त्या प्रश्नाला समाजासमोर मांडण्यासाठी जर एक मंच हवा असेल तर तो फक्त सार्वजनिक गणेशोत्सव हाच होऊ शकतो. हेच लक्षात ठेवून खूप सारे मंडळ आपली सामाजिक जाणीव ओळखून सामाजिक प्रश्न समोर मांडत आहेत. प्रश्न मांडणे , त्यावर विचार करणे आणि समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडणे हेच तर प्रश्न सोडवण्याची प्रथम पायरी आहे.

प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात आपण श्रीगणेशाच्या कामाने करतो. नव्हे तर कार्याची सुरुवात म्हणजेच श्रीगणेशा असे आपण म्हणतो. फक्त सामाजिक नव्हे तर वैयक्तिक जीवनातही आपण चांगले संकल्प घेऊ आणि आपण या आधुनिक भारताचे जबाबदार नागरिक आहोत हे सिद्ध करू. या चांगल्या कार्यासाठी श्रीगणेशाचे आशीर्वाद आपल्याला मिळू दे हीच बाप्पा चरणीं प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया…

लेखक: विवेक वैद्य.

Previous Article

स्मार्ट महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना श्रीगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Next Article

तुमच्या घरच्या गणेशोत्सवाला मिळणार प्रसिद्धी; हे वाचा आणि स्मार्ट महाराष्ट्रवर झळका…

You may also like