Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

संविधान आणि मुलभूत हक्क

Author: Share:

संविधान हा भारतातील सर्वोच्च कायदा आहे . भारताच्या प्रजासत्ताकाचा , सार्वभौमत्वाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा कायदा आहे . सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे मानवी मुल्य , तत्व आणि आधीभावतिक उच्च मुल्यांचा , या देशाची सर्व्भोमता , लोकांच कल्याण आणि त्यांच्या उच्चतम आयुष्यासाठीच्या तत्वाच रक्षण करण्याची जबाबदारी संविधान स्वतः उचलत. संविधानात म्हटल्या प्रमाणे ह्या देशातील लोकांन न्याय justice – सामाजिक , राजकीय आणि अर्थीक स्वातंत्र्य , समता आणि सर्व भारतीयांचे स्वत्व ह्या गोष्टींची शाश्वती संविधान देते.

संविधानाने कलम १४ ते ३२ पर्यंत काही अधिकार नमूद केले आहेत . त्यापैकी कलम १९ मध्ये सांगितलेले अधिकार मुलभूत आहेत . म्हणजे ह्या देशाच्या जमिनीवर असणार्या प्रत्येकाला ते मिळतात . कोणी ते बाधित केले तर त्याविषयी दाद मागण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला असतो. कलम १४ ते २८ पर्यंतचे अधिकार आपण पाहू .

समानतेचा अधिकार सर्व भारतीय कायद्यासमोर समान आहेत
जात – वर्ण भेद लिंग भेदावर  आधारित भेदभाव विरुद्ध राज्य , शासन किंवा कोणीही व्यक्ती धर्म , जात , लिंग या गोष्टींवर भेदाभेद करणार नाही. सर्वांना सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा समान अधिकार आहे. शासन महिला व मुलांसाठी विशिष्ट्य कायदे करू शकेल.
सार्वजनिक रोजगारामध्येसर्वांना समान अधिकार  सर्व भारतीयांना सार्वजनिक नोकरीत समान वागणूक असेल . जात , लिंग यांवरून भेदाभेद केला जाणार नाही . शासन आर्थिक मागासलेल्यासाठी विशेष कायदे करू शकेल.
अस्पृश्यते विरुद्ध  अस्पृश्यता पूर्णतः नामशेष आहे आणि ती पाळण हा गंभीर गुन्हा आहे.
विशेष पदव्या लावण्या विरुद्ध  राज्य , सरकार , शासन कोतेही विशेष पदवी देणार नाही . राजेकालापासून चालत आलेल्या पदव्या लावता येणार नाही.(राष्ट्रपतींच्या सहमतीने अशा पदव्या सरकार, शासन देऊ शकेल).
स्वातंत्र्याचा अधिकार  a) Right to speech – वक्तृत्वाचा, बोलण्याचा अधिकारb) Assemble Peacefully– शांततामय मार्गाने शस्त्रशिवाय जमाव करणे .

c) To form Unions – संघटना निर्माण करणे

d) Move freely throughout the territory of India and settle in any part of India. भारतात कुठेही फिरण्याचा, राहण्याचा आणि कायमस्वरूपी निवास करण्याचा अधिकार

f) To Practice any profession , Carry out any business:भारतात कुठेही कोणताही कायदेशीर व्यवसाय वा नोकरी करण्याचा अधिकार

 

सन्मानाने आयुष्यजगण्याचा अधिकार संसदेने कायदेशीर मार्गाने पारित केलेल्या कायद्यांमध्ये दर्शवलेल्या पद्धतीने या अधिकारावर मर्यादा घालता येते .
मोफत व आवश्यकशिक्षणाचा अधिकार  ६-१४ वयोगटातील मुलांसाठी .
प्रतिबंधात्मक कैद (काळजीसाठी कैद) जर एखाद्या माणसाने कोणा माणसाविरुद्ध पोलिसात तक्रार केली कि त्याच्यापासून तक्रारकर्त्याला धोका आहे , आणि गुन्हा केल्यानंतर आरोपी कैदेपासून मुक्त राहू शकतो किंवा गुन्ह्याचे पुरावे मिळवू शकतो तर पोलिस गुन्हा घडण्या अगोदरच संशयावरून त्या माणसास कैद करू शकतात . परंतु अशा माणसास २४ तासांच्या आत फर्स्ट क्लास मेजिस्ट्रेटला वाटले कि हा संशय अनाठायी आहे . तर तो आरोपीस मुक्त करू शकतो
माणसांच्या खरेदी विक्रीस आणिगुलामांच्या विक्रीस प्रतिबंध Prohibition against traffic in human beings and forced labours
बालकामगार ठेवण्यास प्रतिबंध   १४ वर्षांखालील बालकास आस्थापना , खाण किंवा धोकादायक रोजगारावर ठेवता येणार नाही.
योग्य मार्गाने धर्माचे आचरणकरण्याचे स्वातंत्र्य .धार्मिक संस्था स्थापन करणे 

विशिष्ट्य धर्माबाबत कर भरण्याचे वा न भरण्याचे स्वातंत्र .

अल्पसंख्यांकांना स्वतः ची भाषा व संस्कृतीचे जतन करणे.

‘जनहित याचिका‘   Image result for PUBLIC INTEREST LITIGATION

हा संविधानाने भारतीयांना दिलेला सर्वात महत्वाचा अधिकार आहे . संविधानाने दिलेले मुलभूत हक्क कोणी नाकारत असेल किंवा एखाद्या कायद्यानुसार हे हक्क नाकारले जात असतील तर त्या विरुद्ध उच्च न्यायालय (२२६) किंवा थेट सर्वोच्च न्यायालयात (३२) दाद मागण्याचा अधिकार आहे . एखाद्या घटनेत किंवा परिस्थितीत एकापेक्षा जास्त माणसांना किंवा समूहाला त्रास होत असेल किंवा त्याचे हक्क हिरावले जात असतील तर त्यांच्या वतीने याचिका दाखल केली जाऊ शकते . न्यायालय या याचिकेवर सूचना देऊ शकते . ‘हेबिअस कोर्पस, मेंडेमस , सर्तिओरि , प्रोहिबिशन , क्वो वोरंटी
जनहित याचिका दाखल करण्याचा अधिकार

  1. मेंडेमस
  2. सर्तिओरि
  3. प्रोहिबिशन
  4. क्वो वोरंटी

उत्तम आयुष्याचा अधिकार

सन्मानाने आणि स्वतःच्या इच्छेवर हुकुम आयुष्य जगण्याचा अधिकार म्हणजे काहीही अनुचित प्रकार सहन न करता जगण्याचा अधिकार ह्या अधिकाराची व्याप्ती खूप मोठी आहे . अशी प्रत्येक गोष्ट , ज्यायोगे मला वाटते कि मी माझं आयुष्य सन्मानाने जगू शकत नाही , या अधिकाराची पायमल्ली आहे .

सन्मानाने आयुष्य जगण्याचा अधिकार दहशतवाद किंवा भ्रष्टचाराच्या छायेखाली जगण , राजकारण्यांच्या आणि नोकरशाहांच्या बेछुट वागण्यामुळे किंवा कुठल्याही सामाजिक अस्वास्थ्य निर्माण करणाऱ्या गोष्टीमुळे बाधा येऊ शकते. किंबहुना या अनुचित गोष्टींविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आपल्याला आहे . स्त्रियांविरुद्ध होणारे अत्याचार , रस्त्यांवरील गैरवर्तन या कलमाखाली येऊ शकते . सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे सामाजिक भौतिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि उत्तम पर्यावरणात जगण्याचा अधिकार . या अनुषंगाने रस्त्यावर कचरा टाकणे , थुंकणे या अधिकारांची पायमल्ली करणार्या आहेत.

प्रतिबंधात्मक कैद (अ २२)

प्रतिबंधात्मक कैद म्हणजे खबरदारी म्हणून एखाद्याला अटक करणे. जर एखाद्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली , कि एखाद्या माणसाकडून त्याला जीवाचा वा अगर धोका आहे , किंवा एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे , तर पोलिस त्यांना खात्री पटल्यावर त्या माणसासास खबरदारी म्हणून अटक करू शकतात . अर्थात त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना विशिष्ट्य कायद्यानुसार वागणे बंधनकारक असते.

Previous Article

मुद्रांक शुल्क कायदा आणि कायदेशीर कागदपत्रे

Next Article

लोकमान्य टिळकांचे राजकीय विचार 

You may also like