Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

स्वातंत्र्य म्हणजे विशेषतः स्त्री साठी

Author: Share:

सकाळी उठल्यावर कवचितच चांगली बातमी ऐकायला किंवा टीव्ही वर पहायला मिळते. हे रेप आणि मोलेस्टेशन तर रोज एक दोनदा ऎकतो. कुठे चाललोय आपण? शिक्षणाने सुशिक्षित आणि सुजाण होण्या ऐवजी कुठे भरकटीतीये ही पिढी ?

डोक्यात तिडीक जाते , आणि आपला न्यायालयीन ढिसाळ पणा पाहून रक्त तापत . काय करणार? रागा रागाने मिळेल तिथे पोस्ट टाकतो आणि  पोटातली तिडीक शांत करतो.
मला वाटत अशा लोकांना भर रस्त्यात चोपल तर पाहिजेच पण ज्या मुली वर अन्याय केलाय ती सांगेल ती शिक्षा दिली पाहिजे . मग ती लग्न म्हणाली तर लग्न मग तो राजकारण्यांचा मुलगा असो वा कोणी बिल्डरचा . आणि अशा मुली आणि त्यांचे आई, वडील आयुष्य भर त्यांचीच चुक असल्यासारखे खाली मान घालून आयुष्य जगतात, जणु काही त्यांनीच अपराध केला आहे.
पण पण जेंव्हा एक हरामखोर चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो त्या मुलीने काय करायचं हो ? लिहिताना सुद्धा माझे हात कापताहेत .
माझ्या कडे ना उत्तर आहे ना योग्य शिक्षा तुमच्या कडे आहे ?
हो आणि स्वातंत्र्य? ते ह्या मुलींना कुठलं हो? त्यांनी तर न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगायची जन्म भर.
अर्चना कुलकर्णी | बदलापूर
Previous Article

केदार शिंदें बोलणार केम छो…

Next Article

मविप्र महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा

You may also like