नांदगाव-येथील महाविद्यालयात अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय

Author: Share:

नांदगाव – राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालयाने फुटबॉल खेळाचे वातावरण आणि आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी व फुटबॉल खेळाचे महत्व कळावे व हा जागतिक खेळ भारतीयांमध्ये लोकप्रिय व्हावा तसेच यावर्षी १७ वर्षाच्या आतील मुलांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा भारतात आयोजित केली आहे. हा खेळ सामान्यांना समजावा म्हणून संपुर्ण महाराष्ट्रभर फुटबॉल खेळाचे सामने व प्रचार प्रसार केला जात आहे.

येथील महाविद्यालयात “आंतरवरर्गीय ९ अ साईड फुटबॉल स्पर्धांचे” आयोजन केलेले होते त्यानिमीत्ताने येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णु निकम बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.आय. पटेल होते. त्यांनी या खेळाचे महत्व सांगितले तसेच या खेळामुळे शारिरीक व मानसिक व्यायाम होण्यास मदत होते व जीवनात अपयश पचवण्यासाठी व यशस्वी जीवन जगण्यासाठी अशा  मैदानी खेळाची आज गरज आहे असे ते म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे व प्राचार्यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उदघाटन केले या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील तीन शाखांच्या नऊ संघांनी सहभाग नोंदविला प्रत्येक संघामध्ये पाचमुले, तीन मुली व एक प्राध्यापक असे मिळुन नऊ खेळाडूंचा संघ होता. पहिला सामना एस.वाय.बी.कॉम विरूध्द टी.वाय.बी.ए यांच्यात झाला. क्रिडा संचालक प्रा. दिनेश उकिर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले व फुटबॉल खेळाविषयी माहीती दिली व फुटबॉल खेळाचे नियम त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाविद्यालयातील प्रत्येक वर्गाच्या संघाने खेळात सहभाग नोंदविला यामधुन फायनल साठी एफ. वाय. बी. कॉम व एस.वाय.बी.कॉम या संघात फायनल होणार आहे.

आभार प्रदर्शन प्रा.बी.पी. शिंदे यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय मराठे, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुख प्रा.आर.टी. देवरे, प्रा.एस.एम. नारायणे, प्रा.बोरसे, प्रा.तांबडे, प्रा.देढे, प्रा.दुधमल, प्रा.मापारी, प्रा.गावले, प्रा एन.एम. गावीत प्रा.शेंडगे, गोराडे प्रा.निगळे, प्रा.पाटील, प्रा.सुदाम राठोड, प्रा.सी.ई.गुरूळे, प्रा.एस.एस.वळवी व महाविद्यालयीन कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

१६ सप्टेंबर

Next Article

सुफी व स्टील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दुसरे ऑटोमोटिव्ह स्टील संमेलन संपन्न

You may also like