मत्स्यशेती कशी करावी?

Author: Share:

माणूस  त्याच्या उत्क्रांतीपासून स्वतःचे जीवन सुलभ करण्यासाठी धडपडत आलेला आहे. शेती हे तर सुरुवातीपासून त्याच्या जगण्याचे माध्यम आहे. शेतीची  सुरुवात, निसर्गातून मिळणाऱ्या  कंदमुळे आणि फळांवर जगण्यापेक्षा ,आपण स्वतःच अन्नधान्य निर्माण का करू नये, या विचारातून  झाली असावी . माणूस समुद्री आणि गोड्या  पाण्यातील माशांवर उपजीविका करू लागला , आणि बर्याच ठिकाणी ते त्याचे आवडते खाद्य बनले , यानंतर आपणच माशांची पैदास का करू नये  हा विचार तयार झाला, आणि त्यातूनच सुरुवात झाली एका अत्यंत सुदर व्यवसायाची, मत्स्यशेतीची .

मत्स्यशेती म्हणजे कृत्रिमरीत्या नैसर्गिक वातावरणात केली गेलीली माशांची पैदास. मत्स्यशेतीची  संकल्पना  माशांचे पुनरुज्जीवन कसे होते याचा अभ्यास करून त्यासदृश स्थिती निर्माण करून देण्यावर झाली आहे. उत्तम मत्स्यशेतीचा हा कणा आहे. मत्स्यशेती करू पाहणार्याने अगोदर उत्तम माशांची पैदास कशी करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

व्यवसाय का ?

मासे हा अनेकांच्या जेवणातील आवडीचा पदार्थ, नव्हे काही जणांच्या जेवणातील जीव कि प्राण. माशांची चव घेऊन खाणारे, त्यासाठी विविध जागा उलथून पालथून टाकणारे खवय्ये कमी नाहीत. समुद्रात माशांची पैदास प्रचंड प्रमाणात होते मात्र खाण्याजोग्या माशांची संख्या कमी होत असल्याचे कोळी लोक आजकाल बोलत आहेत . जगभरातील मासेमारीमुळे आणि समुद्राच्या वाढत्या  प्रदूषणामुळे माशांच्या संख्येत घट  होत आहे. त्या तुलनेत खवय्ये वाढत आहेत .

त्यामुळे जिभेचे चोचले पुरवताना व्यवसायाची एक नामी संधी चालून आली आहे .

मत्स्यशेती  सध्याची स्थिती

 मत्स्यशेतीचे दोन प्रकार पडतात

१. गोड्या पाण्यातील

२. निमखार्या पाण्यातील

गोड्या पाण्यातील मत्स्यशेती

गोड्या पाण्यातील मासे हे किनारपट्टी व्यतिरिक्त इतर भागात चवीने खाल्ले जातात . विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर भारतात त्यांना प्रचंड मागणी आहे. याव्यतिरिक्त गोव्यातील  परदेशी पाहुण्यांनाही ते आकर्षित करू शकतात. कोकणातील माणसाला कदाचित प्रेम कमी असेल मात्र  चवीत बदल म्हणूनही  हा खाण्यासाठी पर्याय आहे. त्यामुळे गोड्या पाण्यातील माशांना भारतातच उत्तम मार्केट आहे . निर्यातीसाठी हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे हे ओघाने आलेच .

भारतात तीन प्रकारचे मासे प्रामुख्याने घेतले जातात

१. कोलंबी

२. रोहू

३. कोटला

याव्यतिरिक्त चौथा प्रकार लोकप्रिय होत आहे आणि ज्यात बर्याच संधी आहेत तो म्हणजे पेण  रोहा  भागात मिळणारा  ‘जीताडा हा मासा.

यापैकी सर्वांच्या वाढीसाठी लागणारी यंत्रणा आणि कालावधी जवळजवळ सारखा०च आहे तसेच सर्व मासे एकत्र एकाच तळ्यात घेत येण्यासारखे; आहेत  (पण हा सल्ला नाही ).

आपण कोलंबी उत्पादनाची साधारण माहिती घेऊ:

गोड्या पाण्यातील कोलंबीला  जम्बो प्रोन्झ  म्हणतात कारण हि आकाराने मोठी असते. तिचे शास्त्रीय नाव आहे  ‘माक्रोब्रेकिअम  रोझेन्बेर्गि “. म्हणूनच हॉटेल मध्ये हिला अधिक मागणी आहे. एक कोलंबी  ६०० ग्राम  पर्यंत वजनदार होऊ शकते.

१. हि कोलंबी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहे.

२. काटक  आहे आणि रोगाला सहजी बळी पडत नाही .

३. तलाव धरणे यात वाढवता येते.

४. अतिरिक्त पाणी, शेती आणि इतर कारणाने क्षारपड आणि नापीक झालेल्या जमिनीत तळे खोदून हे उत्पादन काढता येते.

उत्पादनाची पद्धती

कोलंबीच्या उत्पादनाचा कालावधी  साधारणत: ८ महिने असतो. यात थोडी अनियमितता हि असते . काही कोलंब्या लवकर मोठ्या होतात . मादी पेक्षा नर अधिक मोठा होतो. त्यामुळे सहा महिन्यानंतर सतत चाचपणी करणे गरजेचे असते.

सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे उत्तम प्रतीचे बीज. कोलंबीचे बीज चांगले असेल तरच उत्पादन निरोगी आणि सुदृढ असेल. बीज विशिष्ट वातावरणात आणि विशिष्ट ठिकाणी तयार केले जाते त्याला हेच्रिज म्हणतात. रत्नागिरी येथील सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्रात हि बीजे विकत मिळतात.

तलाव  आणि  पाणी

तलाव साधारणतः वीस गुंठे पासून पुढे कितीही जागेत करता येतो. यापेक्षा कमी जमिनीतही म्हणजे अगदी एका गुंठे जमिनीपासून तो करता येईल मात्र मग उत्पादनाचा खर्च  जास्त होतो.तलावाला एका जागी उतार असावा. पाणी बदलण्यास आणि उत्पादन बाहेर काढण्यास मदत होते. तलावाच्या  तळाशी चिकण मातीचा लेप लावावा. तसेच मृदेच्या  सामू प्रमाणे चुन्याचा वापर केला जातो. मातीचा सामू  ७ ते ७.५ असावा लागतो.

पाणी  हा अतिशय महत्वाचा घटक. त्यातील क्षाराचे प्रमाण मातीतील सामुचे प्रमाण हे पाहून शास्त्रीय परीक्षेनंतरच जागेची निवड करावी.

तलावाची रचना माती सामू पाणी क्षार अशा तांत्रिक गोष्टींसाठी  कृषी विद्यापीठातील आणि  रत्नागिरी येथील सागरी जीव संशोधन केंद्रातील तज्ञ मदत करतात.

खते  आणि मत्स्य अन्न

मत्स्यशेतितिल  एक अतिशय चांगला घटक हा  कि सेंद्रिय पदार्थ ज्यातून कल्शिअम , नत्र अधिक प्रमाणात मिळते त्याचा माशांना अन्न म्हणून उपयोग होतो. त्यामुळे पौष्टिक खतांची पिशवी पाण्यात ठेवली, पाण शेवाळ यांचा अन्न म्हणून वापर होतो. कोंबड्यांची विष्ट सुद्धा खत  म्हणून वापरली जाते.

शास्त्रशुद्ध उत्पादनासाठी  उत्तम प्रकारचे अन्न वापरले जाते .

भाताचा कोंडा , शेंगदाण्याची पेंड आणि  सुकट साधारणतः अन्न म्हणून वापरले जातात. हे अन्न  तयार मिळते. ते कणी च्या स्वरूपात असते.

केंद्र आणि राज्य शासनाच्या तळे बांधकाम आणि नविनिकर्नासाठी अनेक कर्ज स्वरूपातील योजना उपलब्ध आहेत . त्यात साधारण २०-२५ % अनुदानाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त  केंद्र, मत्स्यखद्य उभारणी केंद्र यासाठीसुद्धा अनुदानाच्या योजना अहेत.

कुठल्याही सरकारी बँकेत या योजनांची माहिती मिळू शकते.

खार्या पाण्यातील मत्स्यशेती

खार्या पाण्यात टायगर प्रॉन्झ या समुद्री कोलंबीचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनात पाण्याच्या गुणधर्मात क्षाराचे प्रमाण अधिक असावे लागते. याव्यतिरिक्त काही ठराविक बाबी वगळता  साधारण प्रक्रिया वर उल्लेखलेल्या प्रमाणेच आहे.

फायदा असा कि या कोलंबीला उत्पादन कालावधी ५ महिने आहे त्यामुळे वर्षात दोन उत्पादने शक्य होतात.

एक हेक्टर जागेत साधारण १,००,००० बीजे मावतात. त्यामुळे मिळणारा उत्पादन गोड्या पाण्यापेक्षा दुप्पट असते.मात्र गोड्या पाण्यातील कोलंबीच्या मानाने याचे वजन कमी असते .

समुद्री उत्पादन  विकास निर्यात  प्राधिकरण  (MPEDA) कडून यासाठी अनेक प्रकारचे  अनुदान मिळते.

या व्यतिरिक्त खेकड्याचेही उत्पादन खार्या पाण्यामध्ये आणि चिखलामध्ये घेतले जाते.

 मत्स्यशेती प्रशिक्षण : सागरी जीव संशोधन केंद्र , रत्नागिरी ०२३५२२३२९९५

व्हिडीओ: मत्स्यशेती कशी करावी?

व्हिडीओ: खेकडा पालन कसे करावे?”

Previous Article

ध्वनिप्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती

Next Article

व्हिडीओ: मत्स्यशेती कशी करावी?

You may also like