Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

बापं…

Author: Share:

बापं माझा होता बिचारा साधा भोळा,
आई-बापा साठी श्रावण बाळ झाला |
कुटुंबाची जबाबदारी होती त्याच्यावर,
घेतला सारा भार स्वत:च्या खांद्यावर ||१||
नाही थांबला कधी तो, न थांबता
न थकता चालतच राहीला……
असा हा बाप माझा साधा भोळा…..

येवढी जबाबदारी पडली खांद्यावर,
तरी नाही कधी बिचारा तो डगमगला |
स्वकष्ट करीतच राहीला रात्रं-दिवस,
आपल्या परीवारा साठी झटतच राहीला ||२||
आनंदि दिवस आपल्या ऊभ्या आयुष्यात
बिच्याऱ्याने स्वप्नात कधी नं पाहीला……
असा हा बाप माझा साधा भोळा…..

नाही कधी पाहीले बापाला रागवतांना,
वा नाही अंगावर कधी नव-नविन वस्र |
चोहो बाजुंनी ऊभा राहीला ढाली सारखा,
कुटुंबासाठी आपल्या बणुन राहिला शस्र ||३||
नाही कधी कमी पडु दिले कुटुंबाला
नाही पाहिले कधी त्याने स्वत:ला….
असा हा बाप माझा साधा भोळा…..

शेवटच्या श्वासा पर्यंत तो आपल्या आई-,
बापाची निस्वार्थ पणे सेवा करत राहीला |
नाही त्याच्या मदतीला कोणी धावुन आला,
कुटुंबा साठी वेळोवेळी झुंज देत राहीला ||४||
नाही कधी कुणाकडे मदतीला धावला…..
नाहीकधी कुणा समोर नतमस्तक झाला….
असा हा बाप माझा साधा भोळा…

अनवाणी राणावनात भटकतच राहीला,
शेतात आपल्या ऊपाशी पोटी तो राबला |
तप्त ऊन्हाचे चटकेच तो सोशीत राहीला,
ढाली सम कुटुंबा मागे ऊभा राहिला ||५||
कुटुंबाच्या पाठी खंबीर पणे ऊभा राहीला…
संकटावर संकट शेवटपर्यंत झेलत राहीला…
असा हा बाप माझा साधा भोळा…..

श्री. दत्तात्रय शिवराम धनावडे
कोळसेवाडी, कल्याण
भ्रमणध्वनी :- ९८२१३४५१०१

Previous Article

नसतेस घरी तू जेव्हां

Next Article

२० ऑगस्ट

You may also like