Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नांदगाव येथील काही व्यापार्‍याकडून शेतकरी बांधवांची दिशाभुल

Author: Share:

जातेगाव (वार्ताहर) शेतकरी बांधवांनी दिवस रात्र कष्ट करुन पिकवलेल्या ऊन्हाळ कांद्यास कांदा काढल्या पासून गेल्या आठवड्यापर्यंत तीनशे रुपये प्रती क्विंटल भाव मिळत होता, परंतु महाराष्ट्रा व्यतीरीक्त देशात अनेक ठिकानी मोठ्या प्रमानात पाऊस झाल्याने ऊण्हाळ कांदा संपल्या नंतर सुरु होणारे पोळ कांद्याते पिक बहुतांशी ठिकानी नष्ट झाल्यामुळे अचानक ऊन्हाळ कांद्याचे भाव मागणी नुसार पुरवठा कमी पडल्याले वाढले. ऊन्हाळ कांदा पिकवणारे बहुतांशी शेतकरी आपल्या गरजे पुरता कांदा काढल्या नंतर विकून मोठ्या प्रमाणात कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतात  व नंतर जेव्हा भाव वाढ होईल तेव्हा विकता.

 

अशाच काही शेतकर्‍यांना नांदगाव येथील कृषी ऊत्पन्न बाजार समितीमघ्ये आपला कांदा विकण्यासाठी नेला असता येथील व्यापार्‍याने बाजार समितीमध्ये लिलाव बोली बोलून जातेगाव येथील शेतकरी शिवनाथ सोनवणे यांचा व आणखी काही शेतकरी बांधवांचा कांदा खरेदी केला व त्यांना नांदगाव येथील पतसंस्थेचा चेक देऊन त्यांची बोळवन केली व सांगीतले की तुमचे ज्या बँकेत खाते असेल तेथे सदर चेक जमा करा. तुम्हाला दोन तीन दिवसात तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होईल.

 

सोनवणे सह ग्रामिण भागातील शेतकरी बांधवांनी विस्वास ठेऊन सदर पतसंस्थेचा आपआपल्या गावच्या परीसरातील आपले खाते असलेल्या बँकेमध्ये सदर व्यापार्‍याने दिलेला चेक जमा केला परंतु पतसंस्थेचा चेक दुसर्‍या बँकेमध्ये शेतकरी बांधवांनी जमा केल्यामुळे शेतकरी बांधवांना कांदा विकल्याचे समाधान झाले. परंतु कांद्याचे पैसे खात्यावर वर्ग होण्यास किमान पंचविस ते पस्तीस दिवस लागत असल्याने नांदगाव बाजार समितीतील व्यापार्‍यांकडून दिशाभुल होत आहेहे. या बाबत बाजार समितीचे सचिव खैरनार यांच्या बरोबर चर्चा केली असता त्यांनी सांगीतले की व्यापार्‍याने दिलेला चेक न वटता परत आल्यास आमचे कडे तक्रार करा. आम्ही त्या व्यापार्यावर कार्यवाही करु. दररोज कांद्याचे भाव गगनास भिडत असून आपला कांदा विकून पैसे मिळत नसल्याने शेतकरी बांधवांना सध्या तरी डोक्याला हात लाऊन बसण्याचे काम झाले आहे.

 

बातमी: अरुण हिंगमिरे

Previous Article

लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथे होत असलेल्या अंधश्रद्धेच्या कुप्रथेविरुद्ध कारवाई होत नाही, पोलीस ढिम्म

Next Article

बेस्ट ने सोडल्या आहेत जादा बसेस

You may also like