साहेबराव बारवकर यांचे विहिरीत पडल्याने निधन

Author: Share:

जातेगाव (वार्ताहर) – नांदगाव तालुक्यातील बोलठान येथील शेतकरी भाऊसाहेब वामनराव बारवकर वय ७५ वर्ष हे दि.३/०९/१७ रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान स्वता:च्या शेतातील विहीरीला पाणी नसल्याने शेजारील शेतकरी पप्पु बाविस्कर यांच्या शेतातील विहिरीहुन आंघोळीसाठी पाणी आनण्यासाठी गेले असता ७० फुट खोल विहिरीत तोल जाऊन पडल्याने नाकात व तोंडात पाणी गेल्याने आपघाती निधन झाले. त्यांना एक मुलगा असुन अपंग आहे व सुनही अपंग असल्याने मयत साहेबराव बारवकर हे स्वताः पाणी आऩण्यासाठी गेले असता वरील घटना घडली असल्याचे समजते. त्यांच्या पच्छात पत्नी, मुलगा, सुन, चार विवाहीत मुली, जावाई, नातवंडे असा परीवार आहे. नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक बशिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोईर व कुमावत हे करत आहे.

 

बातमी: अरुण हिंगमिरे

Previous Article

युवा फाऊंडेशन ने श्रींची आरती केली स्त्रीच्या हस्ते

Next Article

४ सप्टेंबर

You may also like