शेतीकर्जमाफी साठी अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबर पर्यंत वाढवली

Author: Share:
शेतीकर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत १५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आणणे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. ऑनलाईन अर्ज आणि थोड्या क्लिष्ट पद्धतीमुळे अर्ज करण्यात शेतकऱ्यांना त्रास होत होता असे दिसले. २२ ऑगस्ट पर्यंत २२ लक्ष ४१ हजार शेतकऱ्यांनी नोदंणी केली असून त्यापैकी १८ लक्ष ८५ हजार ४५७ शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये २० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.  १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत अर्जाची छाननी करून १ ऑकटोबर पासून कर्जमाफी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे शासनाने सांगितले. मात्र दाखल झालेल्या अर्जाची ऑनलाइन छाननी सरकारने अजून सुरू केली नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होऊन बँक खात्यामध्ये निधी जमा करण्यास महिना-दीड महिन्याहून अधिक काळ लागेल असे चित्र आहे .
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान या नावाने अमलात आलेल्या या या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले जे ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधीन राहून माफ करण्यात येणार आहे. २०१५ -१६ व २०१६ -१७ या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची तीस जून २०१६ आणि ३० जून २०१७ रोजी  परतफेड केल्यास अशा शेतक-यांना पीक कर्जाच्या २५% अथवा रु. २५,००० लाभ देण्यात येणार आहे. तसेच २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षातील पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल.
 सदर कर्जमाफी योजनेचा राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतक-यांना दिलेल्या कर्जास लागू राहील.
शासन निर्णयशुध्दीपत्र: 
योजनेचा तपशिल” या मथळयाखालील अ.क्र.२ मधील दुस-या ओळीत “.१.४.२०१२” या ऐवजी १.४.२००९ असे वाचावे आणि अ.क्र.२ ड) मधील पहिल्या ओळीत २०१२-१३ ऐवजी “२००९-१०” असे वाचावे.
Previous Article

डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर

Next Article

ओबीसींसाठी मोठी बातमी: क्रिमी लेयरसाठी उत्पन्न मर्यादा ६ लाखावरून वाढवून ८ लाख

You may also like