Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

केंद्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच…

Author: Share:

२०१९ निवडणुकांपूर्वी केंद्र मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होईल अशी शक्यता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा नवीन मंत्र्यांची नावांवर अंतिम नजर फिरवत असल्याचे समजते. २०१९ निवडणुका समोर ठेऊन घटक पक्षांना अधिक जागा दिल्या जाऊ शकतात. मंत्र्यांचे स्कोर कार्ड पाहून समाधानकारक कामे न करणाऱ्याना डच्चू मिळण्याचीही शक्यता आहे.

महाराष्टात राजू शेट्टीचा विचार होत असल्याचे समजते. आज ऐआयडीएमके च्या दोन गटात एकोपा झाला. त्या पक्षाला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

मनोहर पर्रिकर गोव्यात आल्यावर निर्माण झालेली संरक्षण मंत्रीपदाची पोकळी सक्षम नावाने भरली जाऊ शकते. सद्ध्या ते पद अर्थमंत्री अरुण जेटलींकडे असले तरी एवढ्या महत्वाच्या पदावर पूर्णवेळ मंत्री न देण्यातून सरकारवर टीकाही होत आहे.

पक्षाची स्वच्छ प्रतिमा कायम ठेवण्यासाठी चांगले चेहरे निवडले जातील.

Previous Article

परळच्या नरेपार्क गणरायाची सुंदर मूर्ती

Next Article

२२ ऑगस्ट

You may also like