Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

आज दिवस व रात्र सारखीच !

Author: Share:

ग्रेगरीयन कालगणनेनुसार आजपासून दिवस मोठा होत जाईल व २१ जून हा सर्वात मोठा दिवस असेल. आजचा दिवस व रात्र समान असतील. म्हणजे आजचा दिवस व रात्र १२ तास.

पृश्वीचा अक्ष २३.४५ अंशाने कलेलला असल्या कारणाने सूर्योद्य व सूर्यास्ताची जागा दररोज थो़ड्या प्रमाणात बदलत असते. या सर्व प्रक्रियेला आयनिकरवृत्त असे म्हंटले जाते. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या धृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रुवीय भागात असतो. अशा प्रकाराने तो दोन वेळा पृथ्वीच्या विषववृत्ताच्या सम प्रमाणात येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात.  हा दिवस म्हणजे २१ मार्च रोजी म्हणजेच ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रृवीय भागात प्रवेश करतो व २३ सप्टेंबर रोजी ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवीय भागात प्रवेश करतो. आपण विषुवृत्तावर असाल तर दोन्ही दिवशी सूर्य दुपारी १२ वाजता बरोबर डोक्यावर असतो.

२१ मार्च या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास “वसंतसंपात” म्हणतात. तर २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास “शरदसंपात” असे म्हणतात. तर २१ जून या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर उत्तर भागात आलेला असतो. यालाच “उत्तरायण” असे म्हणतात. तर २२ डिसेंबर या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर दक्षिण भागात असतो. यालाच  “दक्षिणायन” म्हणतात. पृथ्वी स्वत भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. त्यामुळेच दिवस व रात्र हे पहर ऋतु निर्माण झाले.

पण पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला असल्याने प्रत्येक वेळी विषुव वृत्तच समोर असते असे नाही. त्यामुळे दिवस लहान-मोठा होत राहतो. परंतू २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी पृथ्वीचे विषुव वृत्त सूर्याच्या समोर येते व दिवस आणि रात्र ढोबळ मानाने समान असतात.  अर्थात दिवसाच्या गणनेतील काही त्रुटी आजही बाकी आहे. यामुळे लिप वर्षासारख्या काळात हा दिवस मागे- पुढेही होतो. आजपासून दिवस मोठा होऊ लागणार, त्यामुळे बोचरी थंडी कमी होऊन वातावरणातील गरमा वाढेल.

संदर्भ :  विकीपीडिया व  इंटरनेट

Previous Article

जागतिक वन दिन

Next Article

२१ मार्च 

You may also like