पर्यावरणपुरक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – जेष्ठ नागरिक संघ, टेनेट फाउंडेशन व संजय (दादा) मोकळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणपुरक गणपती आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कुदरत अली शहा होते. या वेळी आजच्या परिस्थितीत देशाचे पर्यावरण ढासळत चालले आहे, ते संतुलीत करण्याची गरज असून त्यासाठी गणेश उत्सवात पर्यावरणपुरक गणपती व आरास स्पर्धेचे जेष्ठ नागरिक संघ, टेनेट फाउंडेशन व संजय दादा मोकळ सामाजिक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अशी स्पर्धा आयोजित करून एक प्रकारे पर्यावरणाचे संरक्षण करत आहे, असे गौरव उदगार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व परिक्षक प्रा. सुरेश नारायणे यांनी काढले.

व्यासपीठावर पद़्माकरशेठ दुसाने, मेजर ज.का. साळुंके, सौ. कुसुमताई सावंत, प्रियंकाताई दंडगव्हाळ, जेष्ठ नागरिक संघाचे रंगनाथ चव्हाण, विजय चव्हाण, पवार सर सुनिल वाघसर आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगऩाध चव्हाण यांनी केले यावेळी त्यांनी उपक्रमाबाबत माहीती दिली. तर विजय चव्हाण यांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव व आरास ही पर्यावरणाला घातक असु नये, यासाठी नांदगाव परिसरात गेली आठ वर्षापासुन प्रयत्न करत असुन लोकांना आता पर्यावरणाचे महत्व हळुहळू पडू लागले आहे व आता लोकजागृती होत आहे असे ते मनोगतातुन म्हणाले.

यावेळी टेनेट फाऊंडेशनच्या सौ. स्मिताताई दंडगव्हाळ व जेष्ठ नागरिक संघाचे पद्माकरशेठ दुसाने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विजय चव्हाण हे पर्यावरणपुरक गणेशोत्सव सातत्याने गेली आठ वर्षांपासुन करत असल्याची संयोजक व परिक्षकांनी दखल घेऊन त्यांना विशेष पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. तर प्रथम पुरस्कार अर्थव योगेश सरोदे व प्रथमेश  विलास वाघमारे यांना विभागुन दिला तर निखिल बाळु जगताप द्वितीय तर आदिती दिगंबर जावळे तृतिय क्रमांक मिळाला तर हर्षदा शिवाजी लव्हाटे व मानसी सुनिल सोर, साहील देवीदास ठाकरे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या बक्षीसांचे वितरण जेष्ठ नागरिक, टेनेट फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.स्मिताताई दंडगव्हाळ व मिनाताई अग्रवाल, शिवानी अग्रवाल व सुमित गुप्ता परिक्षक सुनिल वाघ व प्रा. नारायणे व जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले.

सहभागी स्पर्धकांनाही सहभाग प्रमाणपत्र दिले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संजय (दादा) मोकळ यांनी केले तर आभार  जेष्ठ नागरिक रंगनाथ चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी नांदगाव शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, सहभागी स्पर्धक, विद्यार्थी व टेनेट फाउंडेशनचे व संजय दादा मोकळ संघटनेचे कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Article

भारत एक राष्ट्र कधीपासून?

Next Article

लोकमान्य टिळक, छत्रपति आणि वेदोक्त प्रकरण; भाग २

You may also like