गुरुकुल पॉलिटेक्निक तर्फे अभियंता दिनानिम्मित रॅली..

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – सर मोक्षगुंडम विश्वशैरया यांचा जन्म दिवस हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो तर या निम्मित नांदगाव शहरातून भव्य रॅली आयोजित केली होती. या रॅली चे उदघाटन वेळी तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, नगराध्यक्ष राजेश कवडे, पोलिस. निरीक्षक बशिर शैख़, पत्रकार संजीव धामणे, दातीर साहेब, पॉलिटेक्निक चे प्राचार्य रुपेश जोशी, आय टी आय चे प्राचार्य विशाल जोशी, गुरुकुल चे सर्व प्राध्यापक वर्ग हजर होते.

रॅली ची सुरवात शिवाजी चौक येथून होउन ती फुले चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक मार्गे शनि मंदिर येथे सांगता झाली. या रॅली दरम्यान विद्यार्थ्यानी इलेक्ट्रिकल चा सुरक्षित वापर,  अपघात कसे रोखावे, घातक सेल्फी, मुलगी शिकली प्रगती झाली, इंजिनिअरींगचे चे महत्व यावर पथनाट्य सादर केले. यानंतर गुरुकल पॉलिटेक्निक येथे सांस्क्रतिक कार्यक्रम घेण्यात आले. विभाग डेकोरेशन चॆ आयोजन केले होते. त्या मध्ये संगणक विभागाला प्रथम तर इलेक्ट्रिकल विभागाला दुसरे क्रमांकाचे पारितोषिक भेटले.

कार्यक्रमाचे आयोजन सिव्हील विभागातर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पॉलिटेक्निक चे प्राचार्य रुपेश जोशी, आय टी आय चे प्राचार्य विशाल जोशी, दत्तु मामा सोनवणे, विभागप्रमुख प्रा. मच्छिंद्र राऊत, प्रा. निलेश ठाकरे, प्रा. शितल जैन, प्रा. कृष्णकांत कासार, प्रा. संतोष माकुणे व सर्व प्राध्यापक वर्ग हजार होते.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

खेळाची संस्कृती जपावी म्हणून निलेशचा ग्रामीण ते आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रवास

Next Article

१७ सप्टेंबर

You may also like