कला शिक्षक विजय चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम; पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून जनजागृती

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – गणेशोत्सव म्हटला की एक वेगळेच वातावरण तयार होते नुकताच श्रावणातली रिमझीम संपवुन धरतीवर हिरवेगार वातावरण झाडाझुडपांनी तयार झालेले असते सगळीकडे आनंदीआनंद निर्माण झालेला असतो. कुठे सायंकाळी एखाद्या धर्मग्रंथाचे पठण (पारायण) चालु असते शेतकरी शेतात धान्य पेरून रिकामे झालेले असतात व नवीन पिक डेर करून पालवी जसे दोन पाने निसर्गाला हात जोडुन उभे असतांना शेतकरी आनंदाने परमेश्वराच्या पुजा पाठात या काळात लीन झालेला असतो. तो काळ म्हणजे भाद्रपद महिना होय याच काळात श्री गणेशाचे आगमन होते व गावचे सर्व वातावरण श्री गणेशाचे मनोभावे आराधना करण्यास सज्ज होते गावातील विविध गणेशोत्सव मंडळांची लगबग चालु होते.

वर्गणी पासुन ते सजावट कोणती करायची आगमनासाठी व विसर्जना साठी कोणता डी.जे.लावायचा ढोल ताशा मंडळासाठी ठरविणे तसेच कोणते कार्यक्रम घ्यावेत, यासाठी मंडळाच्या सदस्यांची मिटींग घेणे मंडळाच्या पदाधिकारी निवडीची धावपळ प्लनिंगची कार्यकर्त्यांनची  बैठकीवर बैठकी झडत राहातात. तर दुसरे मंडळ कोणते डेकोरेशन आणणार आहे याची शोधाशोध चालु असते हे असे वातावरण सगळीकडे आपल्याला दिसुन येते. पण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका असलेले ग्रामिण शहरात विजय चव्हाण नावाचे शिक्षक येथील व्ही.जे. हायस्कुलचे कला शिक्षक आहेत. त्यांच्या डोक्यात गेली आठ वर्षापासुन गणेशोत्सवा बाबत अगदी वेगळा विचार मांडुन समाजाला या निसर्गावर प्रेम करणारा विचार म्हणजे पर्यावरणपुरक विचार रूजविण्याचे काम शाळेतील चिमुकल्याच्या मदतीने सातत्याने करीत असल्याचे लक्षात आले. त्याचे असे झाले की त्यांच्याच या विचाराला खतपाणी घालण्यालाठी जेष्ठ नागरिक संघ, टेनेट फाउंडेशन आणि संजय (दादा)मोकळ सामाजिक मित्रमंडळ यांनी ही संकल्पना या वर्षी उचलुन धरली.

विजय चव्हाण सरांच्या मदतीने गावात जवळपास २०० विद्यार्थ्यांनी आपल्या घरात शाडुमातीपासुन श्री गणेशाची मुर्ती तयार करून घरीच रंग देवुन सुंदर चिमुकल्या हातांनी मुर्ती करून आऱास देखिल करतांना पर्यावरणाची नासधुस होणार नाही तसेच परिसरात प्रदुषण होणार नाही याची काळजी घेवुन या मुलांनी गणपतीची आरास ही पूर्णपणे पर्यावरणपूरक केली आहे. त्यासाठी ते स्वतः. सजावटीसाठी कागद, पुठ्ठा, कापड, माती, रोपटे, धान्य इत्यादी साहित्याचा वापर करून सजावट केली जाते. त्यांच्या घरी सकाळ-संध्याकाळ आरती होते, त्यासाठी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सहकुटुंब आमंत्रित केले जाते, या वर्षी पंचायत समिती सभापती सौ. सुमनताई निकम, नांदगावचे तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख, माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य, जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य यांनी व इतर मान्यवरांनी भेट दिली व ते राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आरती साठी परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी एकत्र जमतात. आरती आगोदर पर्यावरणपूरक गणेशोत्सव का साजरा करावा ? या संदर्भात चव्हाणसरांनी व्हिडीओ क्लिप तयार केली असुन ती दाखवली जाते.

तसेच दरवर्षी सेल्फी काढण्याच्या नादात किती तरुणांना प्राण गमवावे लागत आहेत? याची जाणीव देखील तरुणांना करून दिली जात आहे. या वर्षीची आरास देखील त्याच संबंधी तयार केली आहे. दरवर्षी अशाच वेवेगळ्या विषयांचे प्रबोधन त्यांनी केले आहे. त्याचा चांगला परिणाम देखील परिसरावर जाणवू लागला आहे. गणेश विसर्जन सुद्धा पर्यावरणपूरक पद्धतीने केले जाते. घरासमोर कृत्रिम विसर्जनकुंड तयार करून परिसरातील व शाळेतील विद्यार्थ्यांचे शाडूमातीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते त्यामुळे पाण्याचे प्रदुषण थांबवले जाते व तीच माती पुन्हा पुढच्या वर्षी गणेशाच्या मुर्त्या तयार करण्यासाठी वापरली चालु शकते असे चव्हाण सर म्हणाले तसेच  सर्व जमा झालेले निर्माल्य एकत्रित करून कंपोष्ट खत तयार केले जाते. अशाप्रकारचे उपक्रम सर्व गणेशभक्तांनी  व गणेश मंडळांनी राबवावे असे आवाहन विजय चव्हाण यांनी केले. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील पर्यावरण सुरक्षित तर राहीलच शिवाय ध्वनीप्रदुषण, जलद प्रदुषण कमी तर होईलच पण निर्माल्यापासुन कंपोस्ट खत तयार होवुन ते पिकांना पोषक ठरणार आहे ही एक चांगली बाब आहे त्यांच्या उपक्रमाचे त्यांचे विद्यार्थी अनुकरण करत आहेत ही आनंदाची गोष्टच म्हणावी लागेल पुढील वर्षी हा विचार संपुर्ण भारत वर्षात रूजवावा हीच श्री गणेश चपणी प्रार्थना.

 

बातमी: प्रा. सुरेश नारायणे, नांदगाव

Previous Article

भक्तीतल्या “क” चा फरक

Next Article

११ सप्टेंबर

You may also like