रश्मिन दिवाळी अंक २०१८ साठी साहित्य पाठवण्याचे आवाहन

Author: Share:

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्यातरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.- पु. ल.”

आपल्या लाडक्या भाईंचीच ही शिकवण, म्हणून आज प्रत्येक मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी आपलं कलेशी असणारं नातं तोडू शकत नाही आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेक जणांनी आपली ही आवड जोपासत आपलं लिखाण सुरु ठेवलंय. कधी फेसबुकच्या माध्यमातून तर कधी एखाद्या व्हाट्सअँप पोस्ट मधून ते साहित्य आपण आपल्या मित्र मंडळींपर्यंत पोहचवत देखील असाल. पण नेदरलँड्स मराठी मंडळाच्या दिवाळी अंकातून ते साहित्य आपण जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहचवू शकता. तेव्हा वाट कसली बघताय; लवकरात लवकर आपलं साहित्य आमच्यापर्यंत पोहचवा ह्या वर्षीच्या दिवाळी अंक ‘पु.ल.कित’ मधे समाविष्ट करण्यासाठी..

जगभरातील तमाम पु.ल. प्रेमींकरता आपल्या लाडक्या भाईंबद्दल व्यक्त होण्याची, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याची, आपल्या बालपणात पुन्हा एकदा रमण्याची एक सुवर्णसंधी म्हणजे रश्मिन दिवाळी अंक २०१८ “पु.ल.कित”!

भाईंबद्दल सुचणारे लेख, कविता, त्यांच्या आठवणी…. अहो इतकंच काय तर व्यंगचित्र आणि इतर साहित्याची सुद्धा आम्ही वाट बघतोय. बालमित्रांच्या साहित्यासाठी खास बालविभाग आहेच! त्यांनी मराठी, इंग्रजी अथवा डच भाषेत स्वतः लिहिलेले लेख, कथा, चित्रं या विभागासाठी नक्की पाठवा.

१. लेख मराठीत लिहिलेला असावा.
२. लेखाच्या खाली आपले नाव, राहण्याचे ठिकाण व ई-मेल इ. नमूद करावे.
३.आपला लेख आम्हाला “अटॅचमेन्ट” स्वरूपात पाठवा. वर्ड, पिडीएफ किंवा तुमच्या हस्तलिखिताची स्कॅन प्रत सुद्धा चालेल.
४. शब्दमर्यादा : १२०० ते १५०० शब्द.
५. लेखासोबत फोटो दयायचे असल्यास ते नावांसहित “अटॅचमेन्ट” स्वरूपात पाठवावे.
६. आपले लिखाण nmm.netherlands@gmail.com वर दिनांक ३० ऑगस्ट २०१८ पर्यंत पाठवावे.

Previous Article

उलटा चोर कोतवाल को दाटे

Next Article

लासलगाव येथे आज उन्हाळ कांद्याला 1373 रुपये भाव मिळाला

You may also like