” इवल्या इवल्या गोष्टी ” स्तंभलेखनसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

Author: Share:

स्तंभलेखन हा गंभीरपणे लिहीला जाणारा प्रकार आहे, शब्द-कालमर्यादा सांभाळतानाच तेवढ्याच सातत्याने शैली व दर्जा सांभाळून लिहीणे, सोपं काम नाही. भाषा व निरीक्षणांच्या बाबतीत उत्कर्षाचं लेखन फार थक्क करणारे आहे. माणसां-माणसांतील बारकावे शोधून मानवीपणा व चांगला माणूस होण्यासाठी दिशा शोधण्याचा सूर तिच्या लिखाणातून जाणवतो, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी काढले.

व्हिजनच्या संचालिका, लेखिका डॉ. उत्कर्षा बिर्जे यांच गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांनी दैनिक लोकसत्ता व दैनिक हेराल्ड या वृत्तपत्रांमधून लिहिलेल्या  ” इवल्या इवल्या गोष्टी ”  या स्तंभलेखनाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. या  स्तंभलेखनाच्या प्रकाशन अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथाली समुहाने हा संग्रह प्रकाशित केला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उषा मेहता, प्रकाशक धनंजय गांगल , व ज्येष्ठ लेखक अरुण शेवते उपस्थित होते.

राजन खान पुढे म्हणाले की, जगण्याचं काही सापडायचं असेल तर, खूप वाचायला हवं. पण ते निवडक व नेमकं हवं. नेमकं जगाव कसे  व जग कसे पाहावे, हे समजण्यासाठी आजच्या तरुणांनी  ” इवल्या इवल्या गोष्टी ” हे पुस्तक वाचायला हवं असे ते म्हणाले. चिन्मयी सुमीत म्हणाल्या की, उतकर्षाचा एकेक लेख वाचताना ती कूठे घेउन जाते , कुठले गंध जाणवते, कुठले स्वर ऐकावते ते सगळे  काही सातत्याने आपल्या मनात रुंजी घालत राहतं व आपण खूप वेगळे बनून जातो.

या कार्यकर्माला अनेक रंगकर्मी तसेच मान्यवर रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

 

 

 

 

Previous Article

डाऊनलोड न करताही , आता गेम्स खेळायला मिळणार

Next Article

मनाच्या खिडकीतून !

You may also like