सन २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्त्पन्न दुप्पट करण्यासाठी भाजपा शासन कटिबद्ध – सुरेश बाबा पाटील

Author: Share:

नाशिक(उत्तम गिते): शासनाने सन २०२२ पावेतो शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे.शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला शेतमालास जास्त भाव मिळावा यासाठी केंद्रातील व राज्यातील सरकार अनेक योजना अंमलात आणीत आहे त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ भाजपा नेते श्री सुरेश बाबा पाटील यांनी लासलगाव येथील वि. खरेदी विक्री संघाने आयोजित त्यांच्या सत्काराच्या वेळी केले ते पुढे म्हणाले की शेतकर्यांच्या अडचणीची शासनास जाणीव आहे म्हणूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून शासनाने आखलेल्या विविध योजना सुरू होत आहे निफाड कारखान्यांच्या सध्याच्या एकूण जागेपैकी १०० एकरजागेवर डायपोर्ट प्रकल्प होत आहे.

त्यासाठी थेट जे.एन.पी.टी बंदरापर्यंत जलद वाहतुकीची सोय होणार आहे लासलगाव संघाच्या जागेवर उभे राहणाऱया मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेज सुद्धा शासनाच्या योजनेचा भाग आहे.श्री सुरेश बाबा पाटील यांची केंद्र शासनाने बॉम्बे पोर्ट ट्रस्टवर संचालक म्हणून नियुक्ती केल्याबद्दल लासलगाव खरेदी विक्री संघामार्फत त्यांचा सत्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते.

संघाचे ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक श्री बाबुराव दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर संघाच्या संचालक मंडळावर नियुक्त केलेले तंज्ञ संचालक श्री अशोकराव आवारे व श्री मधुकरराव दरेकर यांना श्री सुरेश बाबा पाटील व बाबुराव दादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले याप्रसंगी संघाचे चेअरमन श्री नानासाहेब पाटील यांनी प्रास्तविक भाषण करून शेतकऱयांच्या समस्या मांडल्या याप्रसंगी संघाचे सर्व संचालक कर्मचारी संघाच्या सभासद आणि विशेष अतिथी जिल्हा परिषद सदस्य डी के नाना जगताप व भाजपा नेते जिल्हा उपाध्यक्ष श्री लक्ष्मणराव निकम व आदी उपस्थित होते.

Previous Article

आजची तरुणाई आणि सावरकर…

Next Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग १

You may also like