दिवेआगरच्या सुवर्णगणेश दरोडा प्रकरणी ५ गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप

Author: Share:

दिवेआगर येथील सुप्रसिद्ध सुवर्ण गणेशमंदिराच्या दरोडा आणि दुहेरी खून प्रकरणात झालेल्या ऐतिहासिक सुनावणीत पाच आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावली गेली. रायगडच्या विशेष मोक्का न्यायालयात किशोर पेटकर यांच्या सावर ही सुनावणी झाली.

याव्यतिरिक्त तीन महिलांना १० वर्षांचा कारावास आणि समाधानाची बाब म्हणजे, या प्रकरणात सहाय्य करणाऱ्या दोन सोने सराफांना सुद्धा ९ वर्षांचा कारावास सुनावला आहे.

रायगड आणि समस्त कोकणसाठी अभिमानाचे स्थान ठरलेल्या, दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाच्या मंदिरावर २४ मार्च २०१२ रोजी दरोडा पडला होता. या दरोड्यावेळेस दरोडेखोरांनी तेथे उपस्थित दोन सुरक्षारक्षकांनाही जीवे मारले होते. ही सव्वा किलो वजनाची मूर्ती वितळवल्याने ती कायमची नष्ट झाली. या घटनेमुळे रायगड नव्हे समस्त महाराष्ट्रभरात संताप पसरला होता.

सुनावल्या शिक्षा:

१. नवनाथ विक्रम भोसले (३२) २. कैलास विक्रम गोखले (२९) ३. छोटया ऊर्फ सतीश जैनू काळे (२५) ४. विजय उर्फ विज्‍या बिज्‍या काळे (२८) ५. ज्ञानेश्‍वर विक्रम भोसले (३४) या पाच जणावर भारतीय दंड विधान कलम ३९६, ३९७, १२० ( ब ) नुसार आजन्म कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

१. कविता ऊर्फ कणी राजू काळे (४४ ), २. सुलभा शांताराम काळे (५६) ३. खैराबाई विक्रम भोसले (५६) यांच्य‍ावर भादंवी कलम १२० (ब) १० वर्ष कारावास व ५०० रुपये दंड ठोठवण्यात आला आहे.

१. आनंद अनिल रायमोकर (मुख्‍य सोनार) आणि अजित अरूण डहाळे (सोनार) य‍ांच्यावर भादंवी कलम ४१२ अन्वये ९ वर्ष कार‍ावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

दोन आरोपींची पुराव्यांअभावी, निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र कुठल्याही आरोपींवर मोक्का लावण्यास मात्र कोर्टाने नकार दिला.

त्यामुळे या सुनावणीमुळे समाधान व्यक्त केले जात असून, ह्या सुनावणीच्या वेळेस सरकारी बाजू मांडलेल्या जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रसाद पाटील, अलिबाग यांच्यावर कौतुकसुमनांचा वर्षाव होत आहे.

हि सुवर्णगणेशमूर्ती अकराच्या शतकातील शिलाहारराजांच्या काळातील असून ती जवळच एका बागेमध्ये जमिनीच्या खाली लोखंडी पेटीमध्ये पुरलेली मिळाली होती. त्यामुळे या सुवर्णगणेशाचे ऐतिहासिक महत्व प्रचंड होते. दुर्दैवाने, या ऐतिहासिक महत्वाची ओळख न पटल्याने, कमकुवत सुरक्षेअंतर्गत मूर्ती ठेवली गेली असावी.

दरोडेखोरांनी निव्व्ल सोन्याच्या मोहापायी या मुर्तीची चोरी केली. ती वितळवण्यामुळे ती कायमची नष्ट झाली आहे. त्यामुळे एका फार मोठ्या ऐतिहासिक ठेवायला आपण आपल्याच हलगर्जीपणामुळे कायमचे मुकलो आहोत. यातील एक किलो २४६ ग्रॅम वितळवलेले सोने पोलिसांनी हस्तगत केल्याचेही सांगितले जाते. याचा वापर करून प्रति मूर्ती स्थापन करावी ही अपेक्षा आहे.

स्मार्ट महाराष्ट्र तर्फे, जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रसाद पाटील, त्यांची पूर्ण टीम, ह्या केसचा तपास लावण्यात सहाय्य करणारे सर्व पोलीस बांधव यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन!

Previous Article

उघडा डोळे… बघा नीट…

Next Article

नाशिक मध्ये व्ही.एम.डब्लू स्पोर्ट्स तर्फे दिवाळी क्रिकेट शिबिराचे आयोजन

You may also like