नाशिक- सायवा नाशिकच्या सदस्या सौ.यशश्री छोरिया यांनी “दिवा मिसेस कॅटवाक-गोल्ड” चा किताब पटकविला.
सौ.छोरिया यांना हा किताब पुण्यामध्ये नुकताच संपन्न झालेल्या “दिवा मिसेस वेस्ट इंडीया-२०१८” या सौंदर्य स्पर्धेत त्यांना बहाल करण्यात आला, ही स्पर्धा ८ एप्रिल रोजी रॅडिसन ब्लू हॉटेल, पुणे मध्ये संपन्न झाली, या स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यातील महिला स्पर्धकांचा सहभाग होता, त्यात नाशिक विभागातून सौ.यशश्री छोरिया यांची निवड करण्यात आली होती.
सौ. छोरिया यांना या आधी मिसेस नाशिक आयकॉन-२०१८ या स्पर्धेत “बेस्ट पर्सनॅलिटी” हा किताब त्यांना मिळाला होता.
सौ.यशश्री छोरिया यांना “दिवा मिसेस कॅटवाक-गोल्ड” हा किताब मिळाल्याने त्यांना सायवाचे महासचिव श्री.निलेश राणे तसेच सायवाचे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे सचिव यांनी त्यांचे अभिनंदन केलेत व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्यात.