Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मांडवड येथे साथीचा आजारांचे थैमान; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) मानवाचा प्रमुख गरजा पैकी आरोग्य ही एक प्रमुख गरज असून मानवाचे आरोग्य सांभाळण्याची कर्तव्य ग्रामीण आरोग्य केंद्र कडे दिलेले असताना नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामीण आरोग्य उपकेंद्र मात्र आजरी पडलेले अवस्थेत आहे. सध्या थंडीताप, मलेरिया, टायफाईड घस्याचे आजार, अतीसार, डेंग्यू सदृश आजारव साथीच्या आजारांनी थैमान घातलेले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मांडवड मात्र कुंभकर्णी निद्रेत असल्याचे दिसून येत आहे.

हे उपकेंद्र हिसवळ केंद्राचा अंतर्गक्त चालवले जाते पण या उपकेंद्रांची अवस्था इतकी बिकट आहे की अगदी आरोग्य केंद्रक आजारांनी ग्रासलेले दिसून येत आहे म्हणजे हे असून ओझे आणि नसून मात्र नितांत अशी अवस्था झाली आहे. मांडवड गाव मोठे लोकसंख्याच गाव असून या ठिकाणी निवासी आरोग्य सेवक  डॉक्टर असणे गरजेचे आहे. परंतु कित्येक दिवसापासून या ठिकाणी डॉक्टर नाही अशे चित्र दिसून येत आहे. नांदगाव आरोग्य केंद्राचा आदर्श घेणं आवश्यक आहे परंतु  ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र ओस पडलेले आहे का? या मागचे खरे कारण नागरिकांना कळतच नसून रुग्णांना उपकेंद्रातून एक ही गोळी मिळत नसून अशे कोणते पाप केले या ग्रामस्तानी की शासनाचा सोयीची फायदा घेऊ शकत नाही.

गावातील अनेक नागरिक गरीब कुटुंबतील असून सध्या ही परिस्थिती बघता त्यांना खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. त्या ठिकाणी हजारो रुपये खर्च होतो हे पैसे आणावे कुठून मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुरांना मात्र आजार अंगावर सहन केल्याशिवाय पर्याय नसून ते ती वेदना सहन करत पडतात. मांडवड येथून हिसवळ या गावी पायपीट करून जाने रुग्णना कठीण जात असून ती पायपीट मात्र आता सहन होत नसून ५ की. मी अंतर जाऊन कठीण प्रसंगांना समोर जावे लागते. तिथे जाऊन देखील कधी डॉ.नसतात तर कधी दवाखाना बंद असतो. अशा परिस्थितीत मात्र ग्रामीण रुग्णालय मांडवड उपकेंद्रांचा सेवकांचा मोबाईल फोन किव्हा कोणताही संपर्क मात्र स्विच ऑफ असतो.

मांडवड ग्रामपंचायत मार्फत याची विचारणा केली असता ग्रामपंचायत स्थरावर नाशिक रुग्णालयाला पत्र व्यवहार केला आहे मात्र संबधित अधिकाऱ्यांनी मात्र या संबंधी उत्तर मात्र टोलवा टोळवीचे दिले त्यात त्यांनी सांगितले की कर्मचारी कमी आहे त्यांची पूर्तता झाली की आपल्या गावात पाठवतो  अशे ६ महिन्यांपासून चालू आहे अशे ग्रामपंचायत प्रसासनांनी सांगितले. अशे कित्येक दिवसापासून चालू असून मात्र गावाला डॉ. मात्र उपलब्ध झाले नाही.या सर्व त्रास मात्र ग्रामस्थाना होत आहे नेमकी शासनाचे हेच का अच्छे दिन असा सवाल जनतेस पडतोय. नागरिकांना होणाऱ्या गैरसोई मुळे अतिशय नाराजी व्यकत होत आहे.

या सर्व प्रकरणावर आरोग्य यंत्रणा ठप्प असून लवकरात लवकर मांडवड उपकेंद्रात निवासी डॉक्टरांची नियुती करावी मागणी संजय निकम, योगेश वाडेकर, कैलास गरुड, संदीप पिंगळे, नंदू नाझरकार, बापू आहेर, दीपक गडाख रामशिंग पिंगळे, शांताराम कदम, अनिल खामकर, विक्रम आहेर आदि सह शेकडो ग्रामस्थांनी मागणी करीत आहे.

प्रतिक्रीया

सरपंच सौ गंगुबाई एकनाथ आहेर

नाशिक जिल्हा रुग्णालयात लेखी पत्र व्यवहार केला असून समनधित अधिकाऱ्याने सांगितले की कर्मचारी  पूर्तता होताच मांडवड  उपकेंद्रात पाठवतो परंतु आजून त्यांनी सेवक पाठवला नाही ग्रामपंचायत स्थरावर आम्ही प्रयत्न करून लवकरात लवकर आरोग्य सेवक नियुक्त करण्याचा प्रयत्न करू.

सिताराम पिंगळे, मांडवड ग्रामस्थ

आमचा गावात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार आले असून मांडवड उपकेंद्रात आरोग्य सेवक नाही ही खूप मोठी खंत आहे तरी शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे.

बातमी: प्रा. सुरेश नारायणे

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनमाड विजयादशमी; उत्सव निमित्त पथसंचलन व शस्त्रपूजन संपन्न

Next Article

३ ऑक्टोबर

You may also like