स्व.पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती मनमाड भाजप मंडलातर्फे साजरी

Author: Share:

नांदगाव ता.२६ (प्रतिनिधी)- भारतीय जनसंघ (आताची भारतीय जनता पार्टी) चे संस्थापक, प्रेरणास्थान आणि एकात्म मानवतावादाचे आद्यप्रचारक स्व.पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती मनमाड शहर भाजप मंडलातर्फे साजरी करण्यात आली. यावेळी पंडीत दिनदयाळ उपाध्याय आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन भाजप शहर उपाध्यक्ष सुनिल पगारे व प्रमुख पदाधिकारी धीरज भाबड यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी यावेळी स्वागत स्वागत व प्रास्ताविक केले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती दिली.

पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपतर्फे संपूर्ण वर्षभरात महाप्रशिक्षण अभियानासह बुथ संपर्क अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमांचा आढावा  सरचिटणीस एकनाथ बोडखे यांनी सादर केला. त्याचबरोबर अंत्योदय गरीब कल्याण या पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या संकल्पनेवर आधारीत एकात्म मानवतावादाची शपथ उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांनी घेतली. या अंत्योदय गरीब कल्याण संकल्पनेत पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या मतानुसार आर्थिक प्रगती ही उच्च आर्थिक गटातील व्यक्तींपेक्षा तळागाळातील माणसांची होवून त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे असे आहे. आणि त्याच आधारावर भारतीय जनता पार्टी देशात व राज्यात सरकार चालवित आहे.

या कार्यक्रमास वरील पदाधिकार्‍यांसह भाजपचे जेष्ठ नेते निळकंठ त्रिभूवन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतिषसिंग परदेशी, विद्यार्थी आघाडीचे शहरप्रमुख शुभम मुनोत,सचिन कांबळे, प्रशांत बनसोडे, अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष बुढनबाबा शेख, अंकुर लुणावत, आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते व भाजप हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शहराध्यक्ष जय फुलवाणी व सरचिटणीस एकनाथ बोडखे यांनी केले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

रविंद्र मालुंजकर यांना काव्यस्पर्धेचा प्रथम पुरस्कार

Next Article

निकीता काळे हिचा नांदगावी सत्कार

You may also like