शाळा डिजीटल व्हायला हवी…

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


दररोज नवनवीन संशोधन होत आहे.नवीन शोध लागत आहे. त्यानुसार देशाची प्रगती होत आहे.कार्यालयीन कागदपत्र आनलाईन पद्धतीने भरता येतात. रेल्वेच्या, बसच्या तिकीटा घरीच बसुन काढता येतात. नोकरीचे फामही भरता येतात.शाळा प्रवेशही तसेच बँक खात्याचे मनीआर्डर पासुन तर सर्व गोष्टी संगणकीय. कारण सध्या संगणकाचाच जमाना आलाय.

प्रत्येक राष्ट्राची प्रगती ही दोन गोष्टीने होते. एक म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था चांगली असावी. तसेच दुसरे म्हणजे प्रत्येक देशाची शिक्षणव्यवस्था चांगली असावी. अर्थव्यवस्थेतील पहिला महत्वाचा घटक म्हणुन कृषीला प्राधान्य द्यावं. त्याचबरोबर त्यावर आधारीत असलेल्या उद्योगालाही. ज्या देशाची कृषी व्यवस्था चांगली. उद्योगधंदे चांगले.तो देश सुसंप्पन्न. हेच देश सुसंपन्नतेच्या यादीत मोडतात. म्हणुनच कृषीबरोबर उद्योगालाही जास्त प्राधान्य द्यावं.

आपल्या देशातील उदरनिर्वाहाचा महत्वाचा घटक कृषी आहे. पण आता कृषी मरत आहे. ही वास्तविकता आहे. त्याचबरोबर कारखानेही बंद पडत आहे. नागपुरचा जर विचार केला तर पुर्वी या नागपुरात सुतगिरणी होती. एम्प्रेस व माडेल मिल होतं. पुर्ण शहरातील बरीचशी माणसे या कारखान्यात काम करुन आपला उदरनिर्वाह करीत. कापसालाही योग्य भाव होता. येथील कापड इंग्लंडलाही जाई. पण आज नागपुरचा विकास या क्षेत्राअंतर्गत ही मिलं बंद पाडली. पण ही मिलं आजुबाजूला हलवली नाहीत.त्यामुळे रोजगार बंद झाला. शिवाय या मिलमध्ये काम करणारी मंडळी बेकार झाली. कित्येकांचे संसार तुटले. शिवाय आजुबाजूला पिकणारा कापुस……त्या कापसालाही भाव उरला नाही.
राष्ट्राची प्रगती ज्या उद्योगधंद्यावर अवलंबून असते. ते उद्योगधंदे बंद झाल्याने नागपुर जिल्हा विकासाच्या क्षेत्रात पिछाडीवर गेलेला आहे.असे सर्वच जिल्ह्याचे झाले.

पुर्वी इंगलंडमध्ये नवनवीन शोध लागले.त्यानुसार उद्योगधंदे उभारले गेले.उद्योगधंद्यात इंग्लडने एवढी प्रगती केली की तो पैसा गुंतविण्यासाठी त्यांनी अविकसीत राष्ट्रात गुंतवला. एवढेच नाही तर त्यांना गुलाम केले.हे सर्व उद्योगामुळे झाले. पण आम्ही मात्र या उद्योगालाही बुडविण्याचे काम करतो.

ज्याप्रमाणे आम्ही देशातील उद्योग, कृषीला प्राधान्य देत नाही. त्याचप्रमाणे आम्ही येथील शिक्षणालाही प्राधान्य देत नाही.नव्हे तर शिक्षणाकडे लक्ष देत नाही. आम्ही आमच्या देशातील मुलांना मोफत शिक्षण म्हणतो. पण देत नाही. आजही उच्च शिक्षण घ्यायचे झाल्यास लाखो रुपये शिक्षणाला मोजावे लागतात. शिवाय प्राथमिक शिक्षण घेतांना त्यालाही पैसे मोजावे लागतात. तरीही सकस शिक्षण मिळत नाही. आज प्रत्येक शिक्षक कर्मचा-यांचे वेतन लाखोच्या घरात असुन त्यांची सहचारीणीही नोकरीवर आहे. तीही लाखोची कमाई करीत असतांनाही त्या घरात पैसा कमी पडतो अशी वारंवार कुरकुर असते. तसेच शाळा अनुदान म्हणुन शाळेत अनुदानही मिळते. तरीही आमची संचालक मंडळी रडतात.शाळा डीजीटल करीत नाही. डीजीटल शिक्षणातुन मुलांना जास्त शिकविण्यापेक्षा सकस असं ज्ञान लवकर देता येतं. शिवाय डीजीटल पद्धतीने शिकवलं तर मुलांच्या लवकर लक्षात राहते. असे असतांनाही आम्हाला डीजीटल साहित्य घेण्यासाठी कस लागणे ही निव्वळ आमची बनवाबनवी आहे असे दिसते.

आजच्या डीजीटल ज्ञानाच्या काळात आमच्या कर्मचा-याकडुन आमचे संचालक देण म्हणुन पाच ते दहा हजार रुपये महिना घेत असतांना शाळेत शिकविण्यासाठी प्रोजेक्टर घेऊ शकत नाही. शाळा संचालकांना अनुदान म्हणुन शिक्षणासाठी एवढा पैसा मिळतो. तरीही प्रोजेक्टर उपलब्ध होत नाही. यावरुन आमच्या देशात शिक्षणासाठी बाता करणारी मंडळी किती झटतात हे दिसुन येते. जर एखाद्या वेळी अनुदानात कपात केली किंवा शिक्षकांचा पगार कमी करुन शाळेत प्रोजेक्टर घेतलं तर कदाचित चांगल्या शिक्षणाची फलश्रुती अनुभवता येईल. आज शासन मुलांना मोफत पाठ्यपुस्तक मिळतं. त्यापरस प्रोजेक्टर दिलं गेलं तर दर्जेदार शिक्षण देता येईल व शिकविल्याचं समाधान लाभेल.
डीजीटल युगात प्रत्येक शाळेत डीजीटल पद्धतीने शिकविण्याला प्राधान्य असावे.

प्रत्येक शाळा डीजीटल व्हावी.अशीच एक डीजीटल शाळा नागपुर जिल्ह्यात आजनगावात आहे. मुले जिल्हापरिषदची जरी असली तरी या डीजीटल पणामुळं लवकर तंत्रज्ञान आत्मसात करतात.यातुन त्यांना शिकवलेलं सहज लक्षात राहतं. यातुन जे शिक्षण होईल. ते आक्सफोर्डलाही मागे टाकेल अशी शंका नाकारता येत नाही.

आज भारतात असं डीजीटल तंत्रज्ञान गावागावात पोहोचलं आहे. पण शहरातल्या ब-याचशा शाळेत याचा गंध नाही.शिक्षकांना न शिकवता फक्त वेतन पाहिजे आहे.संचालकांना अनुदान. पण ते अनुदान आणि ते वेतन केवळ आपला स्वतःचा स्वतःच्या परीवाराचा विकास करण्यासाठी पाहिजे आहे. मला किती माझ्या मुलांसाठी इस्टेट जमा करता येईल असा विचार करीत……पण तीही आमचीच मुले ना…..त्यांच्या भरवश्यावर आपण खातो ना…..याचा विचार कोणीच करीत नाही.शाळेतही गुणवानांची शिकविण्यासाठी भरती नाही. डीजीटल काय ते त्यांना कळत नाही.शिकण्याची तयारी नाही. म्हणुनच देश मागे पडत चालला आहे. डीजीटल इंडीया ही देखील संकल्पना मागे पडत चालली आहे.
ज्या देशात एके काळी तक्षशिला व नालंदा सारखी विद्यापीठं होती. देश विदेशातुन लोक येवुन येथे शिक्षण घेत. त्याच देशातील लोकं शिक्षणासाठी आज दुस-या देशात जातात. आज नालंदा तक्षशिला जावुन दुस-या विदेशी विद्यापीठाची नावे समोर आलेली आहेत.

ऑक्सफोर्डलाही आज या विद्यापीठांनी मागे टाकलेले आहे.हे केवळ शक्य झालं डीजीटल ज्ञानानं. आज आंजनगावच नाही तर प्रत्येक गावातील शाळा जेव्हापर्यंत डीजीटल होणार नाही तेव्हापर्यंत देशाचा विकास होणार नाही. देश सुधारणार नाही. नव्हे तर डीजीटल इंडीयाचे स्वप्न साकार होणार नाही. त्यासाठी प्रत्येक शिक्षक, संचालक, पालक आणि वेळप्रसंगी शासनकर्ते यांनी प्रयत्न करायला हवा.

शाळेत डीजीटल पद्धतीने शिकवले जावे. विद्यार्थ्यांना जीवंत अनुभूती द्यायला हवी. शाळेनेही गुणवान शिक्षकांची कदर करावी.प्रत्येक शाळेत मुलांना संगणक, प्रोजेक्टर हाताळता यावे व हसतहसत स्वतः शिकता येवुन या भारताचच नाव जगाच्या नकाशावर नालंदा तक्षशिलासारखं झळकावं. ऑक्सफोर्डलाही मागे टाकत ऑक्सफोर्डचे विद्यार्थी भारतातुनच तयार व्हावे. त्यासाठी गरज आहे.चांगल्या प्रशिक्षीत गुणवान शिक्षकांची. संचालक, मुख्याध्यापकाच्या खोट्या दडपणाखाली वावरणा-यांची गरज नाही. चापलुस शिक्षकांचाही गरज नाही.तर गरज आहे. आर्य चाणक्यासारख्या मातब्बर शिक्षकांची. ज्यांनी धनानंदाचा तर नाश केलाच. पण नालंदा तक्षशिलेला जगात नाव मिळवुन मिळवुन दिलं नव्हे तर त्या मुख्याध्यापकाचीही गरज आहे. ज्यांनी चाणक्यावर विश्वास ठेवला धनानंदाला न घाबरता.

आज शाळा डीजीटल होवु शकतात. प्रत्येक संचालक मुख्याध्यापकानं विचार केला तर……पण ते विचार करीत नाही.शासनही त्यांच्यापुढे फोल ठरतं. कारण शाळा डीजीटल करतो म्हटलं तर सरकारवर हेच संचालक मुख्याध्यापक संघटना मार्फत दबाब टाकतात.मग कशा होतील डीजीटल शाळा? तरीही आपली मुलं तशी पालकाचीही मुलं असे समजुन आपल्याला आपल्या देशातील प्रत्येक शाळेला नालंदा तक्षशिला बनवायचंय असा विचार करुन शाळा डीजीटल करावी. पालकांनीही त्यात सहभाग देवुन आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा. तेव्हाच देश डीजीटल इंडिया बनेल व आपल्याला डीजीटल इंडियाचे स्वप्न साकार करता येईल. मग शिकण्यासाठी आक्सफोर्डला जाण्याची गरज राहणार नाही. लोकच नालंदा तक्षशिला समजुन उच्चशिक्षणासाठी भारतात शिकायला येतील.

लेखक: अंकुश शिंगाडे लेखक, नागपुर
संपर्क: ९३७३३५९४५०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

चिदंबरम, रिबेरो आणि ख्रिस्ती लॉबी – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Next Article

एक होता पाऊस

You may also like