Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

कळवा स्टेशनच्या विकासाचा मार्ग  

Author: Share:
ठाणे स्टेशनच्या धर्तीवर कळवा स्टेशन परिसराचा विकास करण्यासाठी स्टेशन परिसर सुधारणा कार्यक्रम स्टेशन एरिया ट्राफिक इम्पॉव्हमेन्ट स्कीम (सॅटिस) राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहराच्या विकास आराखड्यानुसार स्टेशन सभोवताली १०.२५ हेक्टर जागा सिडको प्राधिकरणासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र मागच्या २० वर्षांत त्या जागेच्या विकासासाठी सिडकोने कोणतही प्रयत्न न केल्याने त्या जागेचा वापर आता सॅटिस प्रकल्पासाठी केला जाणार आहे.
कळवा खारेगाव भागात भागात घरांची संख्या वाढत आहे तसे कळवा स्टेशनवरील प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. खारेगाव येथील मफतलाल कंपनीची १२३ एकर जागा विकण्यास उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याने तिथे मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात या स्टेशनवर येणारा ताण लक्षात घेता येथे सॅटिस प्रकल्प उभारण्याची आवश्यकता दिसत होती.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सूचनेनुसार कळवा सॅटिसचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे

 

Previous Article

लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, म्हणजे काय?

Next Article

इन्फोसिस चा समभागधारकांना बायबॅकचा सुखद धक्का

You may also like