Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

फेसबुक डिलीट करण्याची योग्य वेळ आलीये- व्हॉटसअॅप सहसंस्थापक

Author: Share:

फेसबुकच्या विघ्नात दिवसेंदिवस वाढ होत जातना दिसत आहे. केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे कंपनी आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यात आता व्हॉटसअॅपचे संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी फेसबुक डिलीट करा असं म्हंटलं आहे.

ब्रायन अॅक्टन यांनी ट्वीट केलं आहे की, “इट इज टाइवम #deletefacebook.” अॅक्टन यांचे सुमारे २३२ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांनी फेसबुक डिलीट कशासाठी करायला सांगितले आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये.

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने जेन कॉम आणि ब्रायन अॅक्टन यांच्याकडून २०१४ साली १६ बिलियन डॉलरमध्ये व्हॉटसअॅप विकत घेतलं होतं.

 

फेसबुकचे लाखो वापरकर्ते “लॉग आऊट”

डेटा घोटाळ्यानंतर लाखो वापरकर्त्यांनी फेसबुकला राम राम ठोकला आहे. चौथ्या तिमाहीत अमेरिका व कॅनडात फेसबुक वापरकर्त्यांची संख्या एक कोटीने कमी झाली आहे.

अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेस फेसबुककडून पाच कोटी वापरकर्त्यांची माहिती गहाळ झाली होती. या काळात गमावलेला वापरकर्त्यांचा विश्वास फेसबुकला अजुनही संपादित करता आला नाही . याचाच परिणाम फेसबुक वापरकर्त्यांच्या संख्येवर होताना दिसतोय.

सोमवारी फेसबुकच्या संपत्तीत ३७ अब्ज डॉलरची घट झाली. मार्क झुकरबर्गला ६.६ अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं आहे. अमेरिकेतील तसेच युरोपातील काही देशांत फेसबुकची चौकशी होत आहे.

 

नक्की हा सर्व घोळ काय आहे ?

२०१७ च्या अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना “केम्ब्रिज अॅनालिटीका” ही कंपनी मदत करत होती. या कंपनीने जवळपास ५ कोटी फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या माहितीचा वापर निवडणुकीत केला, असाहूी आरोप आहे.

ब्रिटनस्थित केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत कशाप्रकारे मदत केली, याबद्दल अमेरिकन व युरोपीय खासदारांनी “फेसबुक इंक” कडे उत्तर मागितले आहे.

 

 

Previous Article

मुंबई पोलिसांनी कुणाल खेमूला का पाठवलं ई-चलान ?

Next Article

उस्ताद बिस्मिल्ला खॉं

You may also like