Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

न्या. दीपक मिश्रा भारताचे ४५ वे सरन्यायाधीश

Author: Share:

अनेक महत्वाच्या खटल्यात दोषींना शिक्षा सुनावणारे ज्येष्ठ न्यायाधीश न्या दीपक मिश्रा यांनी आज भारताचे ४५ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश जे एस खेहर रविवारी निवृत्त झाले.

६४ वर्षीय दीपक मिश्रांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननला फाशीची शिक्षा, निर्भया गँगरेप प्रकरण, सिनेमागृहातील राष्ट्रगीत या महत्वाच्या प्रकरणांमध्ये निर्णय दिले आहेत. सध्या सहारा केस, कावेरी-कृष्णा नद्यांचा विवाद आणि बीसीसीआय केस त्यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर प्रलंबित आहेत.

संविधानाच्या कलम १२४ नुसार सर्वोच्च न्यायायाचे न्यायाधीश (सरन्यायाधीशांसहित) वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत न्यायाधीश राहू शकत असल्या कारणाने, न्या दीपक मिश्रा यांचे पद पुढील वर्षी ऑकटोबर महिन्यात संपुष्टात येईल.

१९७७ मध्ये वकिलीची सनद घेतल्यानंतर संविधान, विक्रीकर, सिव्हिल यामध्ये ओरिसा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. १९९७ मध्ये ओरिसा न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश, नंतर मध्यप्रदेश उच्च न्यायालय आणि नंतर १९९८ मध्ये ओरिसा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना रुजू केले गेले. ओरिसातील ते तिसरे सरन्यायाधीश आहेत.

सरन्यायाधीश

भारतीय संविधानानाने सरन्यायाधीश हे पद महत्वाचे मानले आहे. संविधानाने शासन प्रशासन आणि कायदा वेगवेगळे ठेवले आहेत. कायद्यात शासनाचा हस्तक्षेप नको यासाठी सरन्यायाधीशांच्या निवडीची प्रक्रिया शासन आणि संसद यांच्या अख्त्यारीपासून वेगळी ठेवली गेली आहे.

संविधानाच्या कलम १२४ नुसार सरन्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. यासाठी ते सवोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे मत मागवू शकतात. साधारण सर्वोच्च न्यायालयातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या ज्येष्ठ न्यायाधीशांना या पदाची संधी दिली जाते.

वर सांगितल्याप्रमाणे वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कार्यरत असतात. तीच वयोमर्यादा सरन्यायाधीशांसाठी सुद्धा आहे.

Previous Article

पर्यावरणाला ‘अभय’ कधी मिळणार?

Next Article

न्यायमूर्ती अभय ओक परतले, राज्य सरकारवर बरसले: माफीनामा सादर करा

You may also like