ते डीएड चं जीवन:वादविवाद स्पर्धा

Author: Share:

वादविवाद स्पर्धा.शालेय जीवनात या स्पर्धेला फार महत्व असते.कारण एखाद्या वादाच्या विषयावर वाद करतांना फार मजा येत असते.त्यामुळे ऐकणा-या प्रेक्षकांचेही मनोरंजन होत असते.तसं प्रत्येकाला वाद भांडण करायला आनंद वाटतोच.

आम्ही डी एडला होतो,तेव्हा आमच्याही महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा झाली होती.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा….विषय होता.महिलांना तीस टक्के आरक्षण असावे की नसावे. बरेचसे मातब्बर बोलणारे वक्ते.त्यामुळं कोण नाव तारुन नेईल याची शाश्वती नव्हती. आमच्या महाविद्यालयात सर्वप्रथम सराव घेण्यात आला.त्यात मी,अजित आणि इतर सगळे सहभागी होतो.पण आमचं सरावादरम्यान व्यवस्थित न वाटल्याने आम्हाला बाद करण्यात आले. आम्ही बाद झालो.कारण आमच्यापेक्षा बाकीच्यांचं वक्तव्य चांगलं झालं होतं.त्यामुळे त्यांचं नाव नोंदणी होणं स्वाभाविक होतं.

आमच्या महाविद्यालयातून शितल व बहाकर या दोघांचा नंबर लागला होता.या दोघांपैकी बहाकरचा नंबर लागणं साहजिकच होतं.कारण तो उच्च शिकलेला असुन संत तुकडोजी महाराजांचाचा त्याच्यावर प्रभाव होता.तुकडोजींची भजनं अगदी तोंडपाठ होती . तर मुलींमधून शितलनं वादविवाद स्पर्धेचं नेतृत्व करावं असं ठरलं होतं.

वादविवाद स्पर्धा ही पल्लवी डी एड कॉलेजला होती.त्या महाविद्यालयात अनेक ठिकाणावरुन मुलं आली होती.त्यातील एक-एक मुलं आपल्या प्रगल्भ वाणीने प्रखरपणे आपापलं मत मांडत होते.त्यांचं मत एेकताच आम्हाला उरात धडकी भरत होती.तरीही त्याकडे लक्ष न देता आम्ही आमच्या महाविद्यालयातील मुलांचा नंबर येण्याची वाट पाहात होतो.असाच आता बहाकरचा नंबर आला.

बहाकर…..आरक्षण नको या विषयावर बोलणार होता.वेगवेगळे दाखले देत भाऊ बोलत होता.बोलतांना चार ओळी कवितेच्याही सांगत होता.पण ते सारं डोक्यावरुन जात होतं.वाटलं होतं की एकटा बहाकरच बाजी मारुन नेईल.शितलची गरजच पडणार नाही.पण उलट झालं होतं.निव्वळ महत्वाकांक्षेत आम्हाला हारण्याचा सामना करावा लागला.

काही वेळानं शितलचा नंबर आला.ती आरक्षण असो या विषयावर बोलणार होती.ती बोलायला उभी राहिली. ती उभी होताना वाटलं की ही काय तीर मारणार आहे! पण ऐकावं ते नवलच…..तिनं प्रतिस्पर्ध्याला तोड देत बाजी मारली होती.तिचा उत्तेजनार्थ श्रेणीत नंबर आला होता.एवढी ती छान बोलली होती.

तिचा नंबर जरी आला असला तरी आम्ही तरलो नाही. या वादविवाद स्पर्धेत पाच गुण तर सोडा साधे दोन गुणंही मिळाले नाहीत.आमची अवस्था केविलवाणी पाहण्यासाठी झाली होती.जर शितलने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावलं नसतं तर तोंड दाखवायलाही जागा राहिली नसती.

शितल वाटत नव्हती की वादविवाद स्पर्धेत उत्तेजनार्थ मध्ये येईल.पण तिचा कसून सराव वाखाणण्याजोगा होता.कदाचित हाच विषय तिच्या पुढील भविष्याची दिशा ठरविण्यासाठी कारणीभूत ठरला.आज जी ती व्यासपीठावर वावरते आहे बिनधास्तपणे… हे बिनधास्त वावरणे हे काही अंशी का होईना त्या वादविवाद स्पर्धेत भाग घेतल्याचाच परिपाक होय असे वाटते.

शालेय जीवनात वादविवाद स्पर्धा हा शिकविण्याचा विषय असावा. त्यामुळे चौकस बुद्धी वाढीस लागते. तसेच विद्यार्थी हवे तसे घडविण्यासाठी मदत होते. या वादविवाद स्पर्धेत शितल व बहाकर यांनी जरी भाग घेतला असला तरी हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असल्याने प्रत्येकजण आपल्या बुद्धीचा वापर करुन मनामध्ये चैतन्य फुलवत होता. आजही तो विषय निघाला की आम्हाला गहिवरुन येतं. कधीकधी वाटतं की या स्पर्धा जिंकल्याच कशा!

वादविवाद स्पर्धा असाव्यात.पण वादविवाद नको.वादविवाद स्पर्धेने एखाद्या विषयाची सखोल माहिती मिळते.पण वादविवादामुळे आयुष्य नष्ट होते.आम्ही वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता पण वादविवाद कधी केला नाही.द्वितीयवर्ष निघूनही गेलं. पण वादविवाद केला नाही.वादविवादाच्या वेळी उपाय म्हणुन मौन पाळत होतो.हे तेवढच सत्य आहे.

         अंकुश शिंगाडे लेखक नागपुर ९३७३३५९४५०

 

 

Previous Article

राहुलजींची १५ मिनिटे आणि पार्श्वभूमी !

Next Article

महाराष्ट्राला जगणे शिकवणारे गायक अरुण दाते

You may also like