Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

महाविद्यालयाने केलेल्या संस्कारमुळे आम्ही यशस्वी झालो – दत्तराज छाजेड

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – महाविद्यालयाचा विद्यार्थी जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलातरी त्याला नांदगाव महाविद्यालयाची ओढ ही असणारच कारण या महाविद्यालयाने आमच्यावर केलेल्या संस्कारामुळेच आम्ही जीवनात यशस्वी झालो व आम्हाला शिक्षणाबरोबरच बाह्यजगात कसे वागावे याचे धडे येथील गुरूजनांनी आम्हाला दिले, म्हणून मी सामान्य विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर जावु शकलो असे भावपुर्ण उदगार येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच पार पडला त्यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड म्हणाले.

नांदगाव महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता; यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.एस.आय. पटेल, उपप्राचार्य प्रा. संजय मराठे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.आर.टी. देवरे, प्रा.प्रविण तांबडे, प्रा.सुरेश नारायणे, समाधान पाटील, अँड.सचिन पाटील, संदिप जेजुरकर, अनिल कोतकर, तुषार पांडे, प्रा. अनिल कोतकर, प्रा. सुरसे, साईनाथ आरणे, मनोहर बोरसे, प्रा. गोकुळ बोरसे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. छाजेड म्हणाले की महाविद्यालयाच्या विकासासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा व त्यासाठी माजी विद्यार्थी संघाची जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा माजी विद्यार्थी संघ मदतीला सज्ज असेल असे अश्वासन त्यांनी दिले.

प्रा. प्रविण तांबडे यांनी प्रास्ताविक केले व माजी विद्यार्थी हा जेवढा सक्षम असेल तेवढा महाविद्यालयाचा विकास होतो, महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची आहे असे ते म्हणाले या महाविद्यालयाने आम्हाला संस्कार दिले व या महाविद्यालयाचा आम्ही एक घटक आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो असे माजी विद्यार्थी प्रा. अनिल कोतकर मनोगतात म्हणाले तर माजी विद्यार्थी संघाचे सचिव अँड. सचिन पाटील यांनी गेल्या दहा वर्षात महाविद्यालयाच्या विकासात काय प्रयत्न केले. याची माहीती दिली व पुढे महाविद्यालयातील मुलांना करिअर गाईंडन्स करण्याचा मानस असल्याचे मनोगतात सांगितले तर महाविद्यालयाच्या विकासासाठी आम्ही माजी विद्यार्थी सदैव्य तप्तर आहोत, असे माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष समाधान पाटील म्हणाले महाविद्यालयाचा सर्वांगिन विकास रनिंग ट्रक, बॉटनिकल गार्डन, विविध नवीन पीजी लेव्हलचे अभ्यासक्रमात महाविद्यालय विकास करीत आहे भौतिक सुविधा देखिल उपलब्ध असुन महाविद्यालय आज ग्रामिण भागात असुनही या महाविद्यालयाचे विद्यार्थी अनेक ठिकाणी शासकिय पदावर आहेत.

तसेच सामाजिक, राजकिय व सहकार क्षेत्रात मानाच्या पदावर काम करत असल्याचा महाविद्यालयाला अभिमान आहे असे प्राचार्य डॉ.एस.आय. पटेल म्हणाले यावेळी माजी विद्यार्थी संघाने या महाविद्यालयातील प्रा. सुरेश नारायणे यांना यावर्षी औरंगाबाद येथे अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्यरत्न पुरस्कार व नाशिक येथील वृत्तपत्र लेखक संघाचा मानाचा गोदारत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल सत्कार करण्यात आला. किरण निकम, प्रविण बोढरे, गणेश चोळके, सोनाली काकळीज, भुषण पाटील, अश्विनी कदम, संदेश कसबे, संदिप आहेर, प्रकाश आव्हाड, सुषमा महाले, मुस्कान शेख, प्रियंका पवार, सरोदे, स्वप्नील शिंदे, सुमीत सोनवणे, अभिजित हिरे आदि माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सी.ई. गुरूळे यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा. संजय मराठे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सी.बी. निगळे, प्रा.दिनेश उकिर्डे, प्रा.एस.एस.वळवी, प्रा.एन.एम.गावीत, प्रा.बोरसे, प्रा.सोनटक्के, प्रा.एल.डी.देढे, प्रा.दौंड, प्रा.मापारी, प्रा.दुधमल, प्रा.श्रीमती जाधव, प्रा.तिदार, प्रा.पगार, प्रा.पाटील, प्रा.पवार, प्रा.सुदाम राठोड, प्रा.भरत शेळके, प्रा.गावले, प्रा.गावले व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

२१ सप्टेंबर

Next Article

२० सप्टेंबर

You may also like