बोलठान रस्त्याच्या दुरावस्तेमुळे परीसरातील नागरीक व वाहन चालक त्रस्त

Author: Share:

जातेगाव (वार्ताहर) – नांदगाव तालुक्यातील पुर्व भागातील घाटमाथा परीसरातील बोलठान हे गाव नाशिक जिल्ह्यातील शेवटचे गाव असुन येथे नांदगाव कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे ऊप बाजार समिती आवार आहे. येथे मका, कांदा, धान्यवकडधान्य कुपाशी ईत्यादी आपल्या शेतातील माल विक्री करण्यासाठी दररोज टेपो, ट्रँक्टर, पिकप ईत्यादी मिळेल, त्या वहानामधुन सुमारे तीनशे शेतकरी बांधव आणत असतात. बोलठान येथे व्यापारपेठ व नाशिक जिल्हा मध्यवर्ती आणी बँक ऑफ ईंडीया ह्या दोन बँक असल्याने व पेट्रोल पंप असल्यामुळे परीसरातील तीस ते पस्तीस विवीध कामा निमीत्य येथे यावे लागते.

जिल्ह्यातील शेवटचे गाव असल्याने दररोज लाखो रुपयाची उलाढाल होते, दुचाकी व चारचाकी वहानांसह परीवाहन मंडळाच्या बस, ट्रक ईत्यादी हजारो वहानांची वर्दळ असते. परंतु येथे येण्यासाठी चारी बाजुंनी रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. नऊ फुट रुंद असलेल्या डांबरी रस्त्यास मोटमोठे खड्डे पडलेले असुन रस्त्याच्या बाजुच्या साईडपट्या देखील सुमारे चार ते आठ ईंचांपर्यंत खोल झालेलेल्या आहे. परीसरातील नागरीकांना विवीध कामांसाठी आुपला जीव मुठीत धरुन दररोज याच रस्त्याने जावे लागत आहे. समोरुन किंवा पाठिमागुन वाहन आल्यास वाहन चालकाची मोठी तारांबळ ऊडते माल भरलेले वाहन चालक आपले वाहन रस्त्याच्या खाली ऊतरण्या माकार देतात.

परीणामी आपघात होण्याची शक्यता आहे. गेल़्या कैही दिवसांपुर्वी जातेगाव येथील शेतकरी भिमराव चव्हान यांच्या ट्रँक्टरला दुसर्‍या वाहनाने हुल दिल्यामुळे़ त्यांचा ट्रँक्टर रस्त्याच्या खाली ऊतरल्याने पलटी झाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. सार्वजनीक बांधकाम विभागाने आणखी आपघात होण्यापुर्वी रस्त्याचे रुंदीकरण आणि डागडुजी करावी अशी मागणी नागरीक करत आहे.

बातमी: अरुण हिंगमिरे

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

शासनाचा महसूल चुकवून मोठ्या प्रमाणात वाळुची तस्करी

Next Article

पहिला नांदगावरत्न पुरस्कार डॉ. रोहण बोरसे यांना मिळाला

You may also like