दहीहंडी अपडेट्स 

Author: Share:
आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव देशभर साजरा करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मागील काही वर्षांपासून, उत्सवाला व्यवसायाचे गालबोट लागले होते. प्रचंड बक्षिसाच्या हंड्या फोडण्यासाठी जास्तीत जास्त थर लावण्याची स्पर्धाच सुरु झाली. आणि यातून गोविंदांचे जीव जाण्याच्या, किंवा गंभीर दुखापतीचं दुर्घटना समोर येऊ लागल्या.
न्यायालयापर्यंत हा मॅटर गेला आणि संयोजक आणि याचिकाकर्ते असा वाद निर्माण झाला. संयोजक, भारतीय संस्कृतीच्या नावाखाली आपल्या कृत्यांचे समर्थन करू लागले आणि याचिकाकर्त्यांना हिंदू संस्कृतीच्या मध्ये येण्याचा आरोप सहन करावा लागला.
यावर्षी अनेक संयोजकांनी माघार घेतल्याने गोविंदांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर, काल उच्च न्यायालयाने उत्सवाला परवानगी दिल्यानंतर, आज दहा थरांची विक्रमी हंडी कुणी फोडतो का याकडे संयोजकांचे लक्ष होते.
बोरिवलीच्या शिवसाई मंडळांनी नौपाडा- ठाणे येथे ९ थरांसहित हंडी फोडून जोगेश्वरीच्या जय जवानच्या मागील विक्रमाशी बरोबरी केली. शिवसाई मंडळाला ११ लाखांचे बक्षीस मिळाले. यावर्षीसुद्धा जय जवान ने नऊ थर रचले. काळाचौकी दादर, घाटकोपर, ठाणे अशा मराठमोळ्या भागात दहीहंडी चा उत्साह दिसून आला.
पस्तीस गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर, ऐरोली येथे जयेश तारले (३०) याचा विजेच्या धक्क्याने आणि पालघर येथे रोहन किणी (२१) याचा फिट येऊन मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची आत्तापर्यंत नोंद

झाली आहे.

Previous Article

१६ ऑगस्ट

Next Article

पसायदान विश्वधर्माचे प्रतीक

You may also like